अमरावती-नरखेड मार्गाला दोन नव्या रेल्वेगाड्यांची भेट
जबलपूर, नागपूरशी अमरावतीची रेल्वे कनेक्टिव्हिटी वाढणार अमरावती, 23 जुलै (हिं.स.) । अमरावती-नरखेड रेल्वेमार्गावर लवकरच दोन नव्या रेल्वेगाड्या धावणार आहेत. रेल्वेचा त्यामध्ये समावेश असून, या भागातील प्रवाशांची अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण होण
जबलपूर, नागपूरशी अमरावतीची रेल्वे कनेक्टिव्हिटी वाढणार अमरावती-नरखेड मार्गाला दोन नव्या रेल्वेगाड्यांची भेट


जबलपूर, नागपूरशी अमरावतीची रेल्वे कनेक्टिव्हिटी वाढणार

अमरावती, 23 जुलै (हिं.स.) । अमरावती-नरखेड रेल्वेमार्गावर लवकरच दोन नव्या रेल्वेगाड्या धावणार आहेत. रेल्वेचा त्यामध्ये समावेश असून, या भागातील प्रवाशांची अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण होणार आहे. सुमारे १३५ किलोमीटर लांबीचा बडनेरा-नरखेड रेल्वेमार्ग २० वर्षांपूर्वी सुरू करण्यात आला.

या मार्गावर सुरुवातीला नरखेड-भुसावळ प्रवासी गाडी चालविण्यात आली होती. त्यानंतर नरखेड-काचीगुडा सुपरफास्ट, सिकंदराबाद-जयपूर आणि यशवंतपूर-इंदूर एक्सप्रेससारख्या गाड्या सुरू झाल्या. मात्र नागपूर आणि मध्य प्रदेशात जाण्यासाठी थेट व नियमित रेल्वेसेवा उपलब्ध नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत होती. या मार्गावर नव्या गाड्या सुरू करण्यासाठी विदर्भातील खासदार आणि आमदारांनी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यानंतर अकोला-जबलपूर सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

ही एक्सप्रेस अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, न्यू अमरावती, वलगाव, चांदूर बाजार, मोर्शी, वरुड, नरखेड, पांढुर्णा, मुलताई, आमला, छिंदवाडा, नैनापूरमार्गे जबलपूरला जाणार आहे. अमरावती-नागपूर मेमूला वलगाव, चांदूर बाजार, रिद्धपूर, मोर्शी, वरुड, पुसला, काटोल, कळमेश्वर आदी स्थानकांवर थांबे दिले जाणार आहेत. ही गाडी २१९ किलोमीटरचे अंतर सुमारे साडेचार तासांत पूर्ण करणार असल्याने विद्यार्थी, व्यापारी, नोकरदार आणि सर्वसामान्य प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. ---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande