अमरावतीत भाजयुमोचा काँग्रेस भवनावर मोर्चा; राहुल गांधींविरोधात जोरदार घोषणाबाजी
अमरावती, 23 जुलै (हिं.स.)। दिल्लीतील जंतर-मंतर परिसरातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाकडे करण्यात आलेल्या आंदोलनाच्या निषेधार्थ भारतीय जनता युवा मोर्चा (भाजयुमो) यांनी गुरुवारी अमरावतीतील काँग्रेस भवनावर मोर्चा काढत काँग्रेस आणि लोकसभ
काँग्रेस भवनावर भाजयुमोचा मोर्चा; राहुल गांधींविरोधात जोरदार घोषणाबाजी


अमरावती, 23 जुलै (हिं.स.)।

दिल्लीतील जंतर-मंतर परिसरातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाकडे करण्यात आलेल्या आंदोलनाच्या निषेधार्थ भारतीय जनता युवा मोर्चा (भाजयुमो) यांनी गुरुवारी अमरावतीतील काँग्रेस भवनावर मोर्चा काढत काँग्रेस आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.यावेळी भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसविरोधात घोषणाबाजी करत आपल्या निषेधाची नोंद केली. आंदोलनादरम्यान काही काळ काँग्रेस भवन परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.प्रसारमाध्यमांशी बोलताना भाजयुमोचे शहराध्यक्ष विक्की शर्मा यांनी राहुल गांधी आणि काँग्रेसने केलेल्या आंदोलनाचा निषेध केला. त्यांनी सांगितले की, देशातील युवा वर्ग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी ठामपणे उभा असून २०२९ मध्येही त्यांनाच देशाचे पंतप्रधान म्हणून पाहण्याची जनतेची इच्छा आहे. भविष्यात अशा प्रकारच्या आंदोलनांची पुनरावृत्ती झाल्यास भारतीय जनता युवा मोर्चा त्याला योग्य पद्धतीने उत्तर देईल, असा इशाराही विक्की शर्मा यांनी दिला. या आंदोलनात भाजयुमोचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande