चंद्रपूर - वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार
चंद्रपूर, 23 जुलै, (हिं.स.)। वन विकास महामंडळ चंद्रपूर विभागांतर्गत येणाऱ्या जुनोना वनपरिक्षेत्राच्या सातारा भोसले क्षेत्रात वाघाने गुराख्यावर हल्ला करून ठार केल्याची घटना गुरूवारी दुपारी उघडकीस आली. गुराखी उष्टु पोरते (५५) आपल्या सहकार्यांसोबत सा
चंद्रपूर - वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार


चंद्रपूर, 23 जुलै, (हिं.स.)। वन विकास महामंडळ चंद्रपूर विभागांतर्गत येणाऱ्या जुनोना वनपरिक्षेत्राच्या सातारा भोसले क्षेत्रात वाघाने गुराख्यावर हल्ला करून ठार केल्याची घटना गुरूवारी दुपारी उघडकीस आली.

गुराखी उष्टु पोरते (५५) आपल्या सहकार्यांसोबत सातारा भोसले वनक्षेत्रात गुरे चराईसाठी घेऊन गेला होता. त्यावेळी अचानकपणे त्या परिसरात असलेल्या वाघाने उष्टु पोरते यांच्यावर हल्ला केला आणि जागीच ठार केले. यावेळी सोबतची माणसे हे बाजूच्या झाडावर उंच ठिकाणी जाऊन बसले. माहिती मिळताच जुनोना येथील वनविकास महामंडळाचे कर्मचारी, पोलीस आणि ग्रामस्थ घटनास्थळी पोहचले. शोध घेतला वनविकास महामंडळाकडून घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला. यावेळी ग्रामस्थ आक्रमक झाले होते. बऱ्याच प्रयत्नानंतर मृतदेह बाहेर काढून चंद्रपूर येथे शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.

---------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande