रवी राणा यांच्या पुढाकारातून 'छ. शिवाजी महाराज समाधान शिबिर' उत्साहात; ६८०० लाभार्थ्यांना योजनांचा लाभ
अमरावती, 23 जुलै (हिं.स.) आमदार रवी राणा यांच्या पुढाकारातून आयोजित ''छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिराचे'' उद्घाटन महसूल मंत्री तथा अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते झाले. शिबिराला मोठा प्रतिसाद मिळाला असून विविध शासकीय योज
रवी राणा यांच्या पुढाकारातून 'छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर' उत्साहात; ६८०० लाभार्थ्यांना योजनांचा लाभ


अमरावती, 23 जुलै (हिं.स.) आमदार रवी राणा यांच्या पुढाकारातून आयोजित 'छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिराचे' उद्घाटन महसूल मंत्री तथा अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते झाले. शिबिराला मोठा प्रतिसाद मिळाला असून विविध शासकीय योजनांतर्गत सुमारे ६८०० लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ वितरित करण्यात आला.

कार्यक्रमाला आमदार रवी राणा, माजी खासदार नवनीत राणा, आमदार किरण सरनाईक, महापौर श्रीचंद तेजवानी, जिल्हाधिकारी डॉ. आशिष येरेकर, मनपा आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी सिंधी समाजाला लीज पट्ट्यांचे वाटप करण्यात आले.आपल्या भाषणात आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. सभागृहातील उपस्थितांनी मोबाईल फ्लॅशलाइट सुरू करून शुभेच्छा व्यक्त केल्या. तसेच स्व. अजितदादा पवार यांना अभिवादन करण्यात आले.पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रवी राणा आणि नवनीत राणा यांच्या जनसेवेचे व वृक्षारोपण अभियानाचे कौतुक केले. नवनीत राणा या पुन्हा मोठ्या मताधिक्याने संसदेत निवडून जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच इरविन चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा उभारणीसाठी शासन कटिबद्ध असल्याचे सांगत जलसंधारण आणि जिल्ह्यात एक लाख घरकुलांचे उद्दिष्ट पूर्ण करण्याची ग्वाही दिली.शिबिरात प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, लेक लाडकी योजना, तेजस्विनी प्रकल्प, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, महिला बचत गट कर्ज वाटप, कृषी योजनांचा लाभ, विविध प्रमाणपत्रांचे वितरण, अपंग कल्याण, श्रावणबाळ व संजय गांधी योजना, एसटी सवलत कार्ड, शालेय साहित्य, कौशल्य प्रशिक्षण आदींसह अनेक योजनांचा लाभ लाभार्थ्यांना देण्यात आला.कार्यक्रमाचे नियोजन शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आले असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून समाधान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande