छ. संभाजीनगर - औरंगपुरा येथील सावित्रीबाई फुले भाजी मंडईच्या नूतन इमारतीचे लोकार्पण
छत्रपती संभाजीनगर, 23 जुलै, (हिं.स.)। औरंगपुरा येथील सावित्रीबाई फुले भाजी मंडईच्या नूतन इमारतीचे लोकार्पण संपन्न झाले. मंत्री अतुल सावे, माजी खासदार भागवत कराड, आमदार प्रदीप जयस्वाल यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती तब्बल १४ वर्षांपासून रखडलेला
अ


छत्रपती संभाजीनगर, 23 जुलै, (हिं.स.)। औरंगपुरा येथील सावित्रीबाई फुले भाजी मंडईच्या नूतन इमारतीचे लोकार्पण संपन्न झाले. मंत्री अतुल सावे, माजी खासदार भागवत कराड, आमदार प्रदीप जयस्वाल यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती

तब्बल १४ वर्षांपासून रखडलेला हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आज पूर्णत्वास आल्याने व्यापारी, भाजी विक्रेते आणि नागरिकांना आधुनिक, स्वच्छ व सर्व सुविधांनी सुसज्ज अशी भाजी मंडई उपलब्ध झाली आहे. या प्रकल्पामुळे स्थानिक व्यापाराला नवी चालना मिळेल, विक्रेत्यांना सुरक्षित व नियोजनबद्ध जागा मिळेल आणि नागरिकांना अधिक सोयीस्कर खरेदीचा अनुभव मिळेल.

छत्रपती संभाजीनगरच्या सर्वांगीण विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विविध विकासकामे वेगाने पूर्णत्वास येत आहेत. नागरिकांच्या मूलभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी आणि शहराचा विकास अधिक गतिमान करण्यासाठी असे उपक्रम भविष्यातही सातत्याने राबविले जातील, असा विश्वास आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande