रत्नागिरी : मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त यश फाउंडेशन कॉलेजतर्फे रक्तदान शिबिर
रत्नागिरी, 23 जुलै (हिं.स.) । मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त येथील यश फाउंडेशन कॉलेज ऑफ नर्सिंगतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यश फाउंडेशनचे मॅनेजिंग ट्रस्टी बाळासाहेब माने यांच्या संकल्पनेतून हा सामाजिक उपक्रम राबविण
यश फाउंडेशनमध्ये रक्तदान शिबिर


रत्नागिरी, 23 जुलै (हिं.स.) । मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त येथील यश फाउंडेशन कॉलेज ऑफ नर्सिंगतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यश फाउंडेशनचे मॅनेजिंग ट्रस्टी बाळासाहेब माने यांच्या संकल्पनेतून हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.

या शिबिराला कॉलेजचे प्राचार्य चेतन अंबुपे, रजिस्ट्रार सौ. शलाका लाड, सहरजिस्ट्रार सौ. मानसी मुळे, असिस्टंट प्रोफेसर सौ. अर्चना बाईत, रेडक्रॉस सोसायटीच्या डॉ. मेहेक काझी आणि नाझिया खलिफे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी श्री. माने यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेळोवेळी कोकणाच्या विकासासाठी आणि विविध क्षेत्रांसाठी महत्त्वपूर्ण मदत केली आहे. आगामी काळात वैद्यकीय क्षेत्रात प्रशिक्षित आणि तांत्रिक मनुष्यबळाची मोठी गरज भासणार असल्याने दर्जेदार नर्सिंग शिक्षण आणि सामाजिक बांधिलकी जोपासणे ही काळाची गरज आहे. यश फाउंडेशन त्यासाठीच प्रयत्न करत आहे.

या उपक्रमात यश फाउंडेशन कॉलेज ऑफ नर्सिंगच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने रक्तदान करत सामाजिक जबाबदारीची जाणीव जपली. रक्तदानासारख्या जीवनदायी उपक्रमामुळे गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळणार असल्याची भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande