रायगड-महावितरणची तातडीची कारवाई; २४ तासांनंतर वीजपुरवठा पूर्ववत
हिंदुस्थान समाचार बातमीचा इम्पॅक्ट रायगड, 23 जुलै (हिं.स.) नेरळ येथील सम्राट नगर व मुख्य बाजारपेठ परिसरात वडाच्या झाडाच्या फांद्या वीजवाहिन्यांवर कोसळून तब्बल २४ तास वीजपुरवठा खंडित झाल्याची बातमी हिंदुस्थान समाचारने ठळकपणे प्रसिद्ध करताच महावितरण
Impact of Hindustan Samachar news


Impact of Hindustan Samachar news


हिंदुस्थान समाचार बातमीचा इम्पॅक्ट

रायगड, 23 जुलै (हिं.स.) नेरळ येथील सम्राट नगर व मुख्य बाजारपेठ परिसरात वडाच्या झाडाच्या फांद्या वीजवाहिन्यांवर कोसळून तब्बल २४ तास वीजपुरवठा खंडित झाल्याची बातमी हिंदुस्थान समाचारने ठळकपणे प्रसिद्ध करताच महावितरण प्रशासनाने तातडीने दखल घेत कारवाई केली. धोकादायक वडाचे झाडाच्या फ़ांद्या हटविण्यात आले तसेच तुटलेल्या वीजवाहिन्यांची दुरुस्ती पूर्ण करून परिसरातील वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला.

मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे वडाच्या झाडाच्या फांद्या वीजवाहिन्यांवर पडून तारा तुटल्याने सम्राट नगर व मुख्य बाजारपेठ परिसर अंधारात बुडाला होता. वीज नसल्याने घरगुती इन्व्हर्टर बंद पडले, व्यापाऱ्यांचे व्यवहार विस्कळीत झाले, तर विद्यार्थ्यांच्या अभ्यासावरही परिणाम झाला होता तर बेबी एंजेल स्कुल ने शाळेला सुट्टी घोषित केली. नागरिकांनी संबंधित विभागांच्या हलगर्जीपणाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली होती.

या गंभीर समस्येबाबत हिंदुस्थान समाचारने सविस्तर वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर महावितरणने तातडीने यंत्रणा घटनास्थळी पाठवली. वीजवाहिन्यांना धोका निर्माण करणारे वडाचे झाड हटवून तारा दुरुस्त करण्यात आल्या. त्यानंतर परिसरातील वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला.

वीजपुरवठा सुरळीत झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. मात्र, अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी पावसाळ्यापूर्वी धोकादायक झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्याबरोबरच रेल्वे प्रशासन, वन विभाग आणि महावितरण यांनी परस्पर समन्वयाने कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande