
बीड, 23 जुलै (हिं.स.)।विद्यार्थ्यांच्या न्याय हक्काच्या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला बीडमध्ये वकील बांधवांनी सक्रिय पाठिंबा दर्शविला. न्यायासाठी आवाज उठवत वकीलांनी निषेध आंदोलन केले. यावेळी जय भीम, जय भारत, जय संविधान अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. आंदोलनातून विद्यार्थ्यांच्या मागण्यांना न्याय मिळावा, अशी भूमिका आंदोलकांनी व्यक्त केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis