केवळ झाडे लावणे नव्हे, तर ती जगवणे हेच आपले आद्य कर्तव्य - आ. बोंढारकर
नांदेड, 23 जुलै (हिं.स.)। केवळ झाडे लावणे नव्हे, तर ती जगवणे हेच आपले आद्य कर्तव्य आहे. हिरवाई आणि ऑक्सिजनचे प्रमाण वाढवण्यासाठी ''घनवन'' संकल्पना ही आजच्या काळाची सर्वात मोठी गरज आहे!असे मत आमदार आनंद बोंढारकर यांनी व्यक्त केले ''हरित महाराष्
अ


नांदेड, 23 जुलै (हिं.स.)। केवळ झाडे लावणे नव्हे, तर ती जगवणे हेच आपले आद्य कर्तव्य आहे. हिरवाई आणि ऑक्सिजनचे प्रमाण वाढवण्यासाठी 'घनवन' संकल्पना ही आजच्या काळाची सर्वात मोठी गरज आहे!असे मत आमदार आनंद बोंढारकर यांनी व्यक्त केले

'हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र' तसेच 'एक पेड माँ के नाम' अभियानांतर्गत, मातोश्री प्रतिष्ठान ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स, खुपसरवाडी येथे 'अटल आनंद घनवन' या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा आमदार भंडारकर यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.

हा उपक्रम पर्यावरण संरक्षण, जैवविविधतेचे संवर्धन आणि भावी पिढ्यांसाठी हरित वारसा निर्माण करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. प्रत्येकाने एक झाड लावून ते जगवण्याचा संकल्प केला, तर हरित आणि समृद्ध महाराष्ट्राचे स्वप्न निश्चितच साकार होईल.

यावेळी कामाजी पवार (विश्वस्त, मातोश्री प्रतिष्ठान), विनय पाटील गिरडे (जिल्हाप्रमुख, शिवसेना), नितेश निगडे (सहाय्यक वनसंरक्षक), गिरीश लखेकर (वनपरीक्षेत्र अधिकारी), व्यंकट चारी (सचिव), शंकर पिनोजी (जिल्हासंघटक, शिवसेना) तसेच वनविभागाचे सर्व प्रमुख अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande