परभणी - सेलू येथे विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमातंर्गत राजकीय पक्ष व पत्रकारांची बैठक संपन्न
परभणी, 23 जुलै, (हिं.स.)। भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) कार्यक्रमांतर्गत सेलू येथे उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी शैलेश लाहोटी यांच्या अध्यक्षतेखाली राजकीय पक्षांचे पदाधिकारी, बूथ लेव्हल एजंट आणि पत्रकारांची बैठक सं
परभणी - सेलू येथे विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमातंर्गत राजकीय पक्ष व पत्रकारांची बैठक संपन्न


परभणी, 23 जुलै, (हिं.स.)। भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) कार्यक्रमांतर्गत सेलू येथे उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी शैलेश लाहोटी यांच्या अध्यक्षतेखाली राजकीय पक्षांचे पदाधिकारी, बूथ लेव्हल एजंट आणि पत्रकारांची बैठक संपन्न झाली. बैठकीस नगराध्यक्ष मिलिंद सावंत, तहसिलदार डॉ. शिवाजी मगर, नगरपालिका मुख्याधिकारी महेश गायकवाड, सर्व सहायक मतदार नोंदणी अधिकारी, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आणि पत्रकार उपस्थित होते.

बैठकीत विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. सेलू तालुक्यातील 1,45,592 मतदारांपैकी 1,42,835 मतदारांना गणना फॉर्म वितरित करण्यात आले असून 1,11,834 (76.81 टक्के) फॉर्मचे डिजिटायझेशन पूर्ण झाले आहे, अशी माहिती देण्यात आली.

दि. 8 ऑगस्टपर्यंत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी गृहभेटी घेणार असून 17 ऑगस्ट रोजी प्रारूप आणि 19 ऑक्टोबर 2026 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. दावे व हरकतींवर 17 ऑगस्ट ते 16 सप्टेंबर दरम्यान सुनावणी होणार असल्याचेही सांगण्यात आले.यावेळी शैलेश लाहोटी यांनी सर्व राजकीय पक्ष, बीएलए आणि पत्रकारांनी मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना सहकार्य करून मतदार यादी अचूक व अद्ययावत करण्यासाठी जनजागृती करावी, असे आवाहन केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande