ऑनलाईन मालमत्ता कर भरणाऱ्यांना ४ टक्के सवलतीला उत्स्फूर्त प्रतिसाद; १३,१४१ मालमत्ताधारकांचा लाभ
पुणे, 23 जुलै, (हिं.स.)। पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने सुरू केलेल्या मालमत्ता कराच्या ४ टक्के ऑनलाईन सवलत योजनेला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. १ जुलैपासून सुरू झालेल्या या योजनेचा अवघ्या २२ दिवसांत १३ हज
ऑनलाईन मालमत्ता कर भरणाऱ्यांना ४ टक्के सवलतीला उत्स्फूर्त प्रतिसाद; १३,१४१ मालमत्ताधारकांचा लाभ


पुणे, 23 जुलै, (हिं.स.)। पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने सुरू केलेल्या मालमत्ता कराच्या ४ टक्के ऑनलाईन सवलत योजनेला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. १ जुलैपासून सुरू झालेल्या या योजनेचा अवघ्या २२ दिवसांत १३ हजार १४१ मालमत्ताधारकांनी लाभ घेतला असून, त्यांच्याकडून सुमारे १५ कोटी रुपयांचा मालमत्ता कर ऑनलाईन पद्धतीने भरला गेला आहे.

महापालिकेने चालू आर्थिक वर्ष २०२६-२७ मध्ये मालमत्ता कर वसुली अधिक प्रभावी करण्यासाठी विविध उपक्रम राबविले आहेत. डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देणे, नागरिकांचा वेळ वाचविणे आणि कर भरण्याची प्रक्रिया अधिक सुलभ करणे या उद्देशाने १ जुलै २०२६ पासून ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरणाऱ्या मालमत्ताधारकांना सामान्य करावर ४ टक्के सवलत लागू करण्यात आली आहे. ही योजना ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत सुरू राहणार आहे.

महापालिकेच्या माहितीनुसार, १ एप्रिल ते २२ जुलै २०२६ रोजी सकाळी १० वाजेपर्यंत मालमत्ता करापोटी ५४७ कोटी ९ लाख रुपयांचा महसूल जमा झाला आहे. यामध्ये ऑनलाईन कर भरण्याकडे नागरिकांचा वाढता कल स्पष्टपणे दिसून येत आहे.

कर भरण्याबाबत जनजागृती करण्यासाठी कर आकारणी व कर संकलन विभागाकडून सोशल मीडियावर माहितीपर पोस्ट, व्हिडिओ आणि जनजागृती संदेश प्रसारित केले जात आहेत. तसेच दररोज सुमारे १ ते ३ लाख मालमत्ताधारकांना मोबाईलवर एसएमएस पाठवून ४ टक्के सवलत योजनेची माहिती देण्यात येत असून, मुदतीपूर्वी ऑनलाईन कर भरण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

महापालिकेने ज्या मालमत्ताधारकांनी अद्याप चालू आर्थिक वर्षाचा मालमत्ता कर भरलेला नाही, त्यांनी ३० सप्टेंबर २०२६ पूर्वी ऑनलाईन कर भरून ४ टक्के सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

पिंपरी-चिंचवड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मालमत्ता कराचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. नागरिकांनी ३० सप्टेंबर २०२६ पूर्वी ऑनलाईन मालमत्ता कर भरून महापालिकेच्या ४ टक्के सवलत योजनेचा लाभ घ्यावा.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande