पिं.चिं. महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत विविध प्रस्तावांना हिरवा कंदील
पुणे, 23 जुलै (हिं.स.)। पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत शहराच्या महसूलवाढीला चालना देणारे, आरोग्य सेवा अधिक सक्षम करणारे तसेच पायाभूत सुविधा आणि नागरिकाभिमुख विकासकामांशी संबंधित विविध महत्त्वाच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आ
PCMC


पुणे, 23 जुलै (हिं.स.)। पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत शहराच्या महसूलवाढीला चालना देणारे, आरोग्य सेवा अधिक सक्षम करणारे तसेच पायाभूत सुविधा आणि नागरिकाभिमुख विकासकामांशी संबंधित विविध महत्त्वाच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. स्थायी समितीचे सभापती अभिषेक बारणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी विविध निर्णय घेण्यात आले. सभेच्या प्रारंभी दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले.

सभेत शहरातील ८० उड्डाणपूल व भुयारी मार्गांवरील जाहिरात हक्क १० वर्षांसाठी ई-लिलावाद्वारे देण्यास मंजुरी देण्यात आली. या निर्णयामुळे महापालिकेच्या महसूलात दीर्घकालीन वाढ होणार असून ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) नुसार दरवर्षी उत्पन्नात वाढ होणार आहे. तसेच १८ मीटर व त्यापेक्षा अधिक रुंदीच्या रस्त्यांवरील दिशादर्शक फलकांच्या जाहिरात हक्कांना पाच वर्षांसाठी मंजुरी देण्यात आली.

महापालिकेच्या विविध विभागांतील संगणक प्रणालीची देखभाल आणि दुरुस्ती अखंडित सुरू राहावी यासाठी नवीन एजन्सीची नियुक्ती होईपर्यंत विद्यमान एजन्सीला मुदतवाढ देण्यास मान्यता देण्यात आली.

----------------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande