
नाशिक, 23 जुलै (हिं.स.)। जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात आज दुपारी 'संकल्प ते सिद्धी' उपक्रमांतर्गत उद्योगांकडून प्राप्त झालेल्या विविध तक्रारी व अडचणींच्या अनुषंगाने आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे (MIDC) सहमुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, प्रादेशिक अधिकारी दीपक पाटील, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक प्रशांत पाटील, उद्योग संघटनांच्या वतीने आशिष नहार, मनीष रावल (निमा), देवेन गोसावी (लघु उद्योग भारती), राजेंद्र पानसरे (एआयएमए), सौ. फाल्गुने (एमसीसीआयए) उपस्थित होते.
जिल्हाधिकारी . प्रसाद म्हणाले की, उद्योगांना येणाऱ्या अडचणी प्राधान्याने सोडवाव्यात. निर्यातवाढ व औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी आवश्यक उपाययोजना प्रभावीपणे राबवाव्यात. प्रारंभी अक्षय भोईटे यांनी 'संकल्प ते सिद्धी' उपक्रमांतर्गत प्राप्त झालेल्या तक्रारी, त्यांचे वर्गीकरण तसेच त्यावरील कार्यवाही याबाबत सादरीकरण केले. श्री. सौम्यजित यांनी जिल्ह्यातील निर्यात वृद्धीसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांबाबत माहिती दिली, तर उद्योग संघटनांच्या प्रतिनिधींनी उद्योग क्षेत्राच्या विविध समस्या, पायाभूत सुविधा, निर्यात प्रोत्साहन तसेच विविध विभागांशी समन्वयाबाबत आपल्या सूचना मांडल्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV