
नांदेड, 23 जुलै (हिं.स.)। नांदेड विधानसभा मतदारसंघातील अबचलनगर येथे निवडणूक आयोगातर्फे सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) मतदार नोंदणी शिबिरास आमदार आनंद बोंढारकर यांनी भेट देऊन कामकाजाचा आढावा घेतला. याभागात आतापर्यंत 95% पेक्षा अधिक गणनापत्रकांचे वाटप पूर्ण झाले असून, उर्वरित पात्र मतदारांनीही आवश्यक कागदपत्रांसह आपली नोंदणी लवकरात लवकर पूर्ण करावी.
मतदार यादीतील अचूक व अद्ययावत नोंद ही प्रत्येक नागरिकाचा मतदानाचा हक्क सुरक्षित ठेवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे बीएलओ (BLO) यांच्याकडून प्राप्त झालेले गणनापत्रक वेळेत भरून जमा करावे व आपल्या नोंदणीची खात्री करून घ्यावी. सशक्त लोकशाहीसाठी प्रत्येक पात्र मतदाराची नोंद आवश्यक आहे, असे आमदार बोंढारकर यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis