सोलापुर - २०७ वाहतूक नियमभंगांवर कारवाई; जवळपास २ लाखांचा दंड
सोलापूर, 23 जुलै, (हिं.स.)। सोलापूर शहरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरोधात वाहतूक शाखेने विशेष मोहीम राबवत २०७ ई-चलनांची दंडात्मक कारवाई केली. या कारवाईत १ लाख ९८ हजार ७०० रुपयांचा दंड आकारण्यात आला. सोलापूर शहरात बसविण्यात आलेल
सोलापुर - २०७ वाहतूक नियमभंगांवर कारवाई; जवळपास २ लाखांचा दंड


सोलापूर, 23 जुलै, (हिं.स.)। सोलापूर शहरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरोधात वाहतूक शाखेने विशेष मोहीम राबवत २०७ ई-चलनांची दंडात्मक कारवाई केली. या कारवाईत १ लाख ९८ हजार ७०० रुपयांचा दंड आकारण्यात आला.

सोलापूर शहरात बसविण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे तसेच वाहतूक अंमलदारांच्या माध्यमातून ही कारवाई करण्यात आली. यामध्ये मोबाईलवर बोलत वाहन चालवणाऱ्या १०५ वाहनचालकांवर सर्वाधिक कारवाई करण्यात आली. याशिवाय ट्रिपल सीट वाहन चालविणाऱ्या ३७ जणांवर, रिक्षाच्या पुढील सीटवर प्रवासी घेऊन वाहन चालविणाऱ्या ३१ रिक्षाचालकांवर, विनागणवेश रिक्षा चालविणाऱ्या ९ जणांवर, तसेच एचएसआरपी (HSRP) क्रमांक प्लेट नसलेल्या २५ वाहनांवर ई-चलनाद्वारे दंडात्मक कारवाई करण्यात आली.

वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करून सुरक्षित वाहतुकीस सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त (ACP) सुधीर खीरडकर यांनी केले आहे.

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande