लोकमान्य टिळकांना जयंतीनिमित्त रत्नागिरीत अभिवादन
रत्नागिरी, 23 जुलै (हिं.स.) । लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना जिल्ह्यात ठीक ठिकाणी विविध कार्यक्रमांनी अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी पुष्पहार अर्पण करून अभि
रत्नागिरीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात लोकमान्य टिळकांना अभिवादन करताना जिल्हाधिकारी मनुज जिंदल


रत्नागिरी, 23 जुलै (हिं.स.) । लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना जिल्ह्यात ठीक ठिकाणी विविध कार्यक्रमांनी अभिवादन करण्यात आले.

जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनीही पुष्प वाहून अभिवादन केले. यावेळी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

रत्नागिरी ही लोकमान्य टिळकांची जन्मभूमी असल्यामुळे शहरातील सर्वच शाळांमध्ये टिळक जयंतीचे विविध कार्यक्रमा आयोजित करण्यात आले होते. निबंध आणि वक्तृत्व स्पर्धा तसेच वेशभूषा स्पर्धाही आयोजित करण्यात आली होती. रत्नागिरीच्या टिळक आळीतील लोकमान्यांच्या जन्मस्थानाला अनेकांनी भेट देऊन तेथे त्यांना अभिवादन केले.

दापोली तालुक्यातील चिखलगाव या लोकमान्यांच्या मूळ गावी टिळक विद्यालयामध्ये विविध उपक्रम दिवसभर आयोजित करण्यात आले होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande