दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील कारवाईच्या निषेधार्थ वैजापूर बंद
छत्रपती संभाजीनगर, 23 जुलै (हिं.स.)। दिल्लीतील आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिस कारवाईच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला वैजापूर शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अनेक व्यापारी प्रतिष्ठाने दिवसभर बंद राहिल्
दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील कारवाईच्या निषेधार्थ वैजापूर बंद


छत्रपती संभाजीनगर, 23 जुलै (हिं.स.)।

दिल्लीतील आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिस कारवाईच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला वैजापूर शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अनेक व्यापारी प्रतिष्ठाने दिवसभर बंद राहिल्याने शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. यावेळी सर्वपक्षीय शिष्टमंडळाने पोलीस निरीक्षक सत्यजीत ताईतवाले यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. विद्यार्थ्यांवरील कारवाईची निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी आणि लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार अबाधित ठेवावा, अशी मागणी करण्यात आली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande