
छत्रपती संभाजीनगर, 23 जुलै (हिं.स.)। शासनाच्या विविध योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात येत आहे.शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी प्रशासनाकडून करण्यात येत आहे, अशी माहिती धाराशिव जिल्हाधिकारी किर्ती कुमार पुजारी यांनी दिली आहे.
महसूल विभागात क्रांतिकारी निर्णय घेण्यात आले आहे. औद्योगिक व घरांसाठी आता अकृषक परवानगीची गरज नाही. निवासी अतिक्रमणे नियमाकुल करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. लक्ष्मीमुक्ती योजनेत सातबारावर आता पतीसोबत पत्नीचे नाव घेण्यात येणार आहे.अँग्रीस्टॅकची नोंदणी करण्यात जिल्हा पुढे आहे. स्वामीत्व सनद,मुख्यमंत्री बळीराजा शेतपानंद रस्ते योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे.या योजनेमुळे शेतकऱ्यांना बारमाही रस्ते मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.योजनेतील घरकुलाला वाळू उपलब्ध करून देण्यात येत आहे.यंत्रणा लाभ देण्यासाठी सज्ज असून नागरिकांनी योजनांचा लाभ घ्यावा.असे आवाहनही पुजार यांनी यावेळी केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis