उपासाच्या खाद्य पदार्थांच्या दरात मोठी वाढ
जळगाव , 23 जुलै (हिं.स.) आषाढी एकादशीनंतर आता श्रावण महिन्याला सुरवात होता असून ,सोमवार ,शुक्रवार तसेच इतर व्रत-उपवास करणाऱ्यांची संख्या वाढणार आहे .मात्र उपवाससाठी लागणाऱ्या अनेक खाद्यपदार्थांची किंमत वाढल्याने भाविकांच्या खिशावर अतिरिक्त भर पडणार
उपासाच्या खाद्य पदार्थांच्या दरात मोठी वाढ


जळगाव , 23 जुलै (हिं.स.) आषाढी एकादशीनंतर आता श्रावण महिन्याला सुरवात होता असून ,सोमवार ,शुक्रवार तसेच इतर व्रत-उपवास करणाऱ्यांची संख्या वाढणार आहे .मात्र उपवाससाठी लागणाऱ्या अनेक खाद्यपदार्थांची किंमत वाढल्याने भाविकांच्या खिशावर अतिरिक्त भर पडणार आहे. उपवासातील प्रमुख अन्नपदार्थ असलेली भगरच्या किमतीत यंदा अधिक वाढ झाली आहे.

काही महिन्यापूर्वी १०० ते १२० प्रति किलो मिळणारी भगर आता बाजारात २०० ते २२० प्रति किलो इतक्या किमतीत मिळत आहे . वाढती मागणी आणि मर्यादित पुरवठा हि दरवाढीमागील प्रमुख कारणे मानली जात आहे . भगरसोबतच इतर फराळाच्या पदार्थांच्याही दरातहि वाढ झाली आहे. सध्या साबुदाणा ७० ते ७४ रुपये, शेंगदाणे १४० ते १६० रुपये, राजगिरा सुमारे १४० रुपये, तर पेंडखजूर आणि खजूर सुमारे २०० रुपये प्रतिकिलो विकला जात आहे .गेल्या महिन्याच्या तुलनेत बहुतांश वस्तूंच्या किमती वाढल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. उपवासासाठी लागणारे शेंगदाणा तेलाचे दर सध्या स्थिर आहे . तरी गावरानी तुपाच्या किंमतीत ५ ते १० टक्क्यांनी वाढ झाली आहे . त्यामुळे घरघुती फराळ तयार करण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहे . श्रावण महिन्यात उपवास करणाऱ्यांची संख्या मोठी असल्याने पुढील काही दिवसांत मागणी आणखी वाढण्याची शक्यता असून, त्यामुळे दरात आणखी चढ-उतार होण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande