सिद्धेश्वर काळुसे यांचे निलंबन रद्द; अमरावती जिल्हा परिषदेत शिक्षणाधिकारी म्हणून पुनर्नियुक्ती
अमरावती, 24 जुलै (हिं.स.) : नागपूर जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी सिद्धेश्वर काळुसे यांचे निलंबन राज्य शासनाने रद्द केले असून, त्यांची अमरावती जिल्हा परिषदेत शिक्षणाधिकारी (प्राथमिक) पदावर पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे. शासनाच्या आदेशानुसार
सिद्धेश्वर काळुसे यांचे निलंबन रद्द; अमरावती जिल्हा परिषदेत शिक्षणाधिकारी म्हणून पुनर्नियुक्ती


अमरावती, 24 जुलै (हिं.स.) : नागपूर जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी सिद्धेश्वर काळुसे यांचे निलंबन राज्य शासनाने रद्द केले असून, त्यांची अमरावती जिल्हा परिषदेत शिक्षणाधिकारी (प्राथमिक) पदावर पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे. शासनाच्या आदेशानुसार त्यांनी दोन दिवसांपूर्वी अमरावती येथे नव्या पदाचा कार्यभार स्वीकारला.

शासनाच्या २४ सप्टेंबर २०२५ रोजीच्या आदेशानुसार सिद्धेश्वर काळुसे यांना महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ अंतर्गत प्रस्तावित विभागीय चौकशीच्या अनुषंगाने निलंबित करण्यात आले होते. मात्र, निलंबनाच्या आदेशानुसार तीन महिन्यांच्या आत विभागीय चौकशी अथवा न्यायिक कार्यवाही सुरू न झाल्यास निलंबन आपोआप संपुष्टात येईल, अशी तरतूद करण्यात आली होती.

त्या अनुषंगाने राज्य शासनाने त्यांचे निलंबन रद्द करत विभागीय चौकशीच्या अधीन राहून अमरावती जिल्हा परिषदेत शिक्षणाधिकारी (प्राथमिक) पदावर नियुक्ती केली आहे.

शासनाच्या निर्देशानुसार काळुसे यांनी नव्या पदाचा कार्यभार तात्काळ स्वीकारला असून, कार्यभार स्वीकारल्याचा अहवाल शासनाकडे सादर करण्याच्या सूचनाही संबंधित अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.

-------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande