आषाढी वारीसाठी नाशिक विभागातून ३०० जादा एसटी बसेसचे नियोजन
नाशिक, 24 जुलै (हिं.स.)। आषाढी पंढरपूर यात्रेनिमित्त महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागाने २० ते ३० जुलै २०२६ या कालावधीत भाविकांच्या सोयीसाठी ३०० जादा एसटी बसेसचे नियोजन केले आहे. यात्रेचा मुख्य दिवस आषाढी शुद्ध एकादशी, २५ जुलै
आषाढी वारीसाठी नाशिक विभागातून ३०० जादा एसटी बसेसचे नियोजन


नाशिक, 24 जुलै (हिं.स.)। आषाढी पंढरपूर यात्रेनिमित्त महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागाने २० ते ३० जुलै २०२६ या कालावधीत भाविकांच्या सोयीसाठी ३०० जादा एसटी बसेसचे नियोजन केले आहे. यात्रेचा मुख्य दिवस आषाढी शुद्ध एकादशी, २५ जुलै २०२६ असून गुरुपौर्णिमा २९ जुलै २०२६ रोजी आहे.

यात्रेकरूंच्या वाढत्या गर्दीचा विचार करून विभागातील विविध आगारांतून पंढरपूरसाठी विशेष बस सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नाशिक विभाग नियंत्रकांनी प्रसिद्धीस दिलेल्या माहितीनुसार, नाशिक-१, नाशिक-२, मालेगाव, मनमाड, सटाणा, सिन्नर, नांदगाव, ठ, येवला आणि पिंपळगाव विभाग ल. संबंधित बसस्थानकांवर पुरेशा संख्येने प्रवासी उपलब्ध झाल्यास थेट पंढरपूर बससेवा सुरू करण्यात येईल. एसटी प्रशासनाने भाविकांनी नियोजित बसस्थानकांवरून प्रवास करून या विशेष बस सेवेचा लाभ घ्यावा, तसेच प्रवाशांची संख्या पुरेशी असल्यास थेट पंढरपूर बससेवा उपलब्ध करून दिली जाईल, असे आवाहन केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande