छ. संभाजीनगर - आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी सन्मान वर्षानिमित्त प्रेरणादायी उपक्रमाचे आयोजन
छत्रपती संभाजीनगर, 24 जुलै (हिं.स.)। देवा भाऊ कृषी माऊली सोहळा – आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी सन्मान वर्षानिमित्त प्रेरणादायी उपक्रमाचे आयोजन बदनापूर येथे करण्यात आले होते. देवा भाऊ कृषी माऊली सोहळा तसेच आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी सन्मान वर्षानिम
अ


छत्रपती संभाजीनगर, 24 जुलै (हिं.स.)। देवा भाऊ कृषी माऊली सोहळा – आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी सन्मान वर्षानिमित्त प्रेरणादायी उपक्रमाचे आयोजन बदनापूर येथे करण्यात आले होते.

देवा भाऊ कृषी माऊली सोहळा तसेच आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी सन्मान वर्षानिमित्त बदनापूर येथील कृषी विज्ञान केंद्र येथे महिला शेतकरी भगिनींसाठी उपयुक्त बियाणे व शेती साहित्य भेट देण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाचे आयोजन भाजपा महिला मोर्चा जालना जिल्हाध्यक्षा सौ. संध्याताई देठे आणि बदनापूर महिला मोर्चा तालुकाध्यक्षा सौ. अश्विनीताई पवार यांनी केले.

याप्रसंगी भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा सौ. प्रणीतीताई देवरे-चिखलीकर यांनी उपस्थित महिला शेतकरी भगिनींना आधुनिक शेती, सेंद्रिय शेती, पीक नियोजन, तंत्रज्ञानाचा वापर आणि महिलांच्या शेतीतील योगदानाबाबत मोलाचे मार्गदर्शन केले.

यावेळी भाजपा महिला मोर्चा जालना जिल्हाध्यक्षा तथा जालना महानगरपालिका सभापती सौ. संध्याताई देठे, बदनापूर महिला मोर्चा तालुकाध्यक्षा सौ. अश्विनीताई पवार, बदनापूर तालुकाध्यक्ष श्री. भगवान मात्रे पाटील, बदनापूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सौ. चित्राताई संतोष पवार, बदनापूर नगरपंचायत नगरसेवक श्री. पद्माकर जऱ्हाड, कृषी विज्ञान केंद्र, बदनापूर येथील मृदा परीक्षण विभागाच्या सौ. अश्विनी बोडके, अर्चना सोसे, संतोष वरकड, देशमुख ताई तसेच मोठ्या संख्येने महिला शेतकरी भगिनी उपस्थित होत्या.

महिला शेतकरी सक्षमीकरण, आधुनिक शेतीचा प्रसार आणि कृषी क्षेत्रात महिलांचे योगदान अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम प्रेरणादायी आणि समाजोपयोगी ठरला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande