
नाशिक, 24 जुलै (हिं.स.)। मतदार यादी शुद्धीकरण अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी भारतीय जनता पार्टी,नाशिक महानगर जिल्ह्याच्या वतीने नाशिक पूर्व, मध्य व पश्चिम विधानसभा मतदारसंघांची महत्त्वपूर्ण आढावा बैठक एस आय आर प्रमुख व मा.खा.डॉ.किरीट सोमय्या यांच्या प्रमुख उपस्थितीत वसंतस्मृती, भाजपा कार्यालय,एन.डी.पटेल रोड,नाशिक येथे संपन्न झाली.
यावेळी डॉ.किरीट सोमय्या यांनी मतदार यादी शुद्धीकरण अभियानाची उद्दिष्टे,मतदार नोंदींची अचूकता,घराघरांत जाऊन माहितीची पडताळणी, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता तसेच प्रत्येक पात्र मतदारांची नोंद सुनिश्चित करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.मतदार यादी त्रुटीमुक्त व अद्ययावत करण्यासाठी प्रत्येक आमदार ,पदाधिकारी, नगरसेवक व कार्यकर्त्याने जबाबदारीने काम करून अभियान शंभर टक्के यशस्वी करण्याचे आवाहन त्यांनी केले.
तसेच बूथस्तरावरील कामकाज अधिक प्रभावी करण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने कार्य करण्याच्या सूचना देत, मतदारांशी सातत्याने संपर्क ठेवून प्रत्येक पात्र नागरिकाचा समावेश मतदार यादीत होईल याची दक्षता घेण्याचेही त्यांनी सांगितले.
बैठकीस भाजपा नाशिक महानगर जिल्हाध्यक्ष सुनील केदार,आ.प्रा.देवयानी फरांदे,आ.ॲड.राहुल ढिकले, लक्ष्मण सावजी,विजय साने,महानगर सरचिटणीस सुनील देसाई,ॲड.श्याम बडोदे, नाना शिलेदार,मंडल अध्यक्ष शांताराम घंटे,उदय जोशी,बबन ढगे, ॲड.पवन गुरव,वैभव महाले,चंद्रशेखर पंचाक्षरी,राहुल गनोरे,गौरव बोडके, नितीन कुलकर्णी,महिला मोर्चा अध्यक्ष स्वाती भामरे,युवा मोर्चा अध्यक्ष प्रवीण भाटे यांच्यासह नगरसेवक,पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV