
छत्रपती संभाजीनगर, 24 जुलै (हिं.स.)
बदनापूर तालुक्याची संजय गांधी निराधार योजना समितीची बैठक समितीचे अध्यक्ष म्हणुन आमदार नारायण कुचे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
या बैठकीस उपविभागीय अधिकारी रामदास दौंड तहसीलदार श्री. शंकर हंडेश्वर, गट विकास अधिकारी श्रीमती ज्योती राठोड तसेच समितीचे सदस्य श्री. संदीप भानुदास पाटोळे, सौ. सपना विशाल सोनवणे आदी उपस्थित होते.
बैठकीत संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना तसेच इतर सामाजिक सुरक्षा योजनांअंतर्गत प्राप्त प्रकरणांचा आढावा घेण्यात आला. पात्र लाभार्थ्यांना शासनाच्या योजनांचा लाभ पारदर्शक, वेळेत व कोणत्याही अडथळ्याविना मिळावा, यासाठी आवश्यक बाबींवर सविस्तर चर्चा करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.
समाजातील निराधार, वृद्ध, दिव्यांग, विधवा तसेच गरजू नागरिकांना शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ प्रभावीपणे मिळावा, ही शासनाची भूमिका असून त्यासाठी प्रशासनाने संवेदनशीलतेने व जबाबदारीने कार्य करावे, असे निर्देश यावेळी देण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis