चंद्रपूर : चिंचाळा येथे आयुष्मान आरोग्यवर्धिनी उपकेंद्राचे लोकार्पण
चंद्रपूर, 24 जुलै (हिं.स.)। चंद्रपूर तालुक्यातील चिंचाळा येथे सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन, जि.प.आरोग्य विभाग, प्राथमिक आरोग्य केंद्र ताडाली अंतर्गत आयुष्मान आरोग्यवर्धिनी उपकेंद्राच्या नवीन इमारतीचे लोकार्पण आमदार किशोर जोरगेवार यांच्य
चंद्रपूर : चिंचाळा येथे आयुष्मान आरोग्यवर्धिनी उपकेंद्राचे लोकार्पण


चंद्रपूर, 24 जुलै (हिं.स.)।

चंद्रपूर तालुक्यातील चिंचाळा येथे सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन, जि.प.आरोग्य विभाग, प्राथमिक आरोग्य केंद्र ताडाली अंतर्गत आयुष्मान आरोग्यवर्धिनी उपकेंद्राच्या नवीन इमारतीचे लोकार्पण आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.

यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, गटविकास अधिकारी संगिता भांगरे, चिंचाळा ग्रामपंचायत प्रशासक शोभा चिमुरकर, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश शेंडे, तसेच आरोग्य सेविका हिमकांता खोब्रागडे, आरोग्य सेवक उमाकांत रायपुरे यांच्यासह चिंचाळा गावातील नागरिक, आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर, गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. उपस्थित होते.

या आरोग्यवर्धिनी उपकेंद्रामुळे चिंचाळाच्या जवळपास दहा गावातील नागरिकांना दर्जेदार व सुलभ आरोग्य सेवा मिळणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande