आरक्षण उपवर्गीकरण समर्थन महामोर्चानिमित्त २७ जुलैला लातूर शहरातील वाहतुकीत बदल
लातूर, 24 जुलै, (हिं.स.)। आरक्षण उपवर्गीकरण समर्थन महामोर्चानिमित्त २७ जुलै रोजी लातूर शहरातील वाहतुकीत बदल; नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा. दिनांक २७ जुलै २०२६ (सोमवार) रोजी लातूर शहरात आयोजित करण्यात आलेल्या आरक्षण उपवर्गीकरण समर्थन महाम
वाहतुकीत बदल


लातूर, 24 जुलै, (हिं.स.)। आरक्षण उपवर्गीकरण समर्थन महामोर्चानिमित्त २७ जुलै रोजी लातूर शहरातील वाहतुकीत बदल; नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा. दिनांक २७ जुलै २०२६ (सोमवार) रोजी लातूर शहरात आयोजित करण्यात आलेल्या आरक्षण उपवर्गीकरण समर्थन महामोर्चाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक अमोल तांबे (भा.पो.से.) यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३३(१)(ब) अन्वये विशेष वाहतूक नियोजन लागू केले आहे.

हा महामोर्चा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक येथून सुरू होऊन गंजगोलाई – हनुमान चौक – महात्मा गांधी चौक – मिनी मार्केट – छत्रपती शिवाजी महाराज चौक – जुने जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गाने जाणार असल्याने मोठ्या प्रमाणात नागरिकांची उपस्थिती अपेक्षित आहे. त्यामुळे सकाळी ७.०० ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत काही प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक बंद ठेवून पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.

वाहतुकीसाठी बंद राहणारे मार्ग.

बार्शी रोडवरील शहीद वीर भगतसिंग चौक (पी.व्ही.आर. चौक) ते संविधान चौक, एक नंबर कॉर्नर, पाण्याची टाकी, दयानंद गेट मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक.

अंबाजोगाई रोडवरील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक (नवीन रेणापूर नाका) ते जुना रेणापूर नाका मार्ग.

नांदेड रोडवरील गरुड चौक ते स्वामी विवेकानंद चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शाहू महाराज चौक, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक.

वरील मार्गांवर सर्व प्रकारच्या वाहनांच्या वाहतुकीस बंदी राहील.

पर्यायी वाहतूक व्यवस्था.

बार्शी रोडवरील एसीब.टी. बस वाहतूक शहीद वीर भगतसिंग l (पी.व्ही.आर. चौक) चौकातून रिंगरोडमार्गे नवीन व जुना रेणापूर नाका बसस्थानकाकडे वळविण्यात येईल.

औसा रोडवरील एस.टी. बसेस छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील बस डेपोचा वापर करतील. इतर वाहने जुना औसा रोड, आशियाना बंगला, साईधाम व खाडगाव टी-पॉईंट मार्गे जातील.

अंबाजोगाई व नांदेड रोडवरील एस.टी. बसेस जुना रेणापूर नाका बसस्थानकाचा वापर करतील. इतर वाहने रिंगरोड, गरुड चौक, बाभळगाव नाका, डी-मार्ट रोड तसेच सिद्धेश्वर मंदिर मार्गे वळविण्यात येतील.

शहरातील अंतर्गत वाहतुकीसाठी.

राजस्थान विद्यालय – बेद्रे-खाडगाव रोड – रिंगरोड तसेच गांधी चौक – बस्वेश्वर महाविद्यालय – रमा चित्रपटगृह – खोरी गल्ली – शिवनेरी लॉज या पर्यायी मार्गांचा वापर करावा.

लातूर पोलिसांचे नागरिकांना आवाहन.

मोर्चादरम्यान वाहतूक पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे, अनावश्यकपणे बंद मार्गांचा वापर टाळावा व पर्यायी मार्गांचा अवलंब करून पोलिस प्रशासनास सहकार्य करावे. नागरिकांच्या सहकार्यामुळे वाहतूक सुरळीत राहण्यास तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यास मदत होईल.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande