
अमरावती, 24 जुलै (हिं.स.)। मोर्शी येथील प्रलंबित असलेल्या नळा नदीवरील अर्धवट पुलाचे बांधकाम येत्या आठ दिवसांत प्रत्यक्षदर्शी सुरू होत असल्यामुळे मोर्शी-तालुक्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मोर्शी-वरूड रस्त्यावर असलेल्या या पुलावर अपघात होऊन जीवितहानीसुद्धा झाली आहे. या गंभीर समत्स्येची दखल घेत मोर्शी येथील भाजपाचे विद्यमान नगरसेवक यांच्यासह माजी नगराध्यक्ष यांनी एक निवेदन आमदार महोदयांना दिले. लगेच त्यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या कार्यकारी अभियंता यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. दरम्यान त्यांनी येत्या आठ दिवसांत या पुलाच्या कामाला स्पष्ट प्रत्यक्षदर्शी सुरुवात होणार असल्याचे त्यांनी केले. नांदगाव पेठ ते पांढुर्णा या रस्त्याचे बांधकाम जवळपास चार ते पाच वर्षापासून पूर्णत्वास गेले असूनसुद्धा येथील नळा नदीवरील अर्धवट पुलाचे बांधकाम रखडलेले आहे. परिणामी अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे. '
नांदगाव पेठ ते पांढुर्णा हा असलेला हा पूल एका बाजूने पूर्ण मुख्य महामार्ग असून दुतर्फा करण्यात आलेला आहे परंतु दुसऱ्या बाजूने अर्थअवस्थेत सोडलेला आहे. या पुलालगतच तीर्थक्षेत्र सालबर्डी येथे जाणारा मार्ग असल्यामुळे ये-जा करणाऱ्या वाहनांची कोंडी निर्माण झाली आहे. वरूड वरून अमरावतीकडे दिसत नाही. त्यामुळे वरुडवरून जाणाऱ्या वाहनांना हा अर्धवट पूल अमरावती येथे धान्य घेऊन जाणाराआयशर ट्रक नदी काठावर असलेल्या खड्चात पलटी झाला होता. १७ मार्च रोजी माजी मंत्री यशोमतीताई ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस कार्यकर्त्यांनी जमिनीपासून ५० ते बसून आंदोलन छेडले होते. ६० फूट अंतर असलेल्या पुलावर त्यावेळी अमरावती येथील राष्ट्रीय महामार्गाच्या कार्यकारी अभियंता आकांक्षा काळे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन एक महिन्याच्या आत प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, असे आश्वासन दिल्यावर तूर्तास उपोषण मागे घेण्यात आले होते.
दरम्यान चार महिन्यांचा कालावधी लोटूनसुद्धा या अर्धवट पुलाचे बांधकाम सुरू करण्यात आले नाही. शेवटी आता मोर्शी विधानसभा मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष आ. चंदू यावलकर यांनी थेट राष्ट्रीय महामार्गाच्या अभियंता यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क केला असता येत्या आठ दिवसांत या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होणार असल्याचे त्यांनी सांगितले. कैलास फंदे, विद्यमान नगरसेवक निवेदन देतेवेळी माजी नगराध्यक्ष आप्पासाहेब गेडाम, हर्षल चौधरी, नितीन पन्नासे, अजय आगरकर, ब्रह्मानंद देशमुख तसेच भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.
--------------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी