एसआयआर अभियान वेळेत पूर्ण करण्याच्या आयुक्तांच्या सूचना
नांदेड, 24 जुलै (हिं.स.)। एसआयआर अभियान वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना छत्रपती संभाजी नगर विभागाचे आयुक्त जी.श्रीकांत यांनी केल्या आहेत.नांदेड जिल्ह्यातील अधिकाऱ्यांच्या बैठकीत त्यांनी सूचना दिल्या. विशेष सखोल पुनरनिरीक्षण (एसआयआर) अभियान हे अत्यंत
एसआयआर अभियान वेळेत पूर्ण करण्याच्या आयुक्तांच्या सूचना


नांदेड, 24 जुलै (हिं.स.)।

एसआयआर अभियान वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना छत्रपती संभाजी नगर विभागाचे आयुक्त जी.श्रीकांत यांनी केल्या आहेत.नांदेड जिल्ह्यातील अधिकाऱ्यांच्या बैठकीत त्यांनी सूचना दिल्या.

विशेष सखोल पुनरनिरीक्षण (एसआयआर) अभियान हे अत्यंत महत्त्वाचे असून त्यामध्ये कोणतीही दिरंगाई होऊ नये. प्रत्येक टप्प्याचे नियोजन करून विहित मुदतीत अभियान पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. अभियानाच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेत आवश्यक मार्गदर्शनही केले.

एआय व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यावर भर

शासकीय कामकाजात नावीन्यपूर्ण संकल्पना आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्याची गरज व्यक्त करत त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) व आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने प्रशासन अधिक कार्यक्षम बनविण्याचे आवाहन केले. नागरिकांना जलद आणि दर्जेदार सेवा देण्यासाठी प्रत्येक अधिकाऱ्याने तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करावा, असे त्यांनी स्पष्ट केले.

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande