जायकवाडी पक्षी अभयारण्य संवेदनशील क्षेत्र मॉनिटरिंग समितीच्या कामकाजाचा आढावा
छत्रपती संभाजीनगर, 24 जुलै, (हिं.स.)। जिल्हाधिकारी कार्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे जायकवाडी पक्षी अभयारण्य संवेदनशील क्षेत्र मॉनिटरिंग समितीच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी बैठक पार पडली. या बैठकीत जायकवाडी पक्षी अभयारण्य परिसरातील पर्यावरणीय संवर
अ


छत्रपती संभाजीनगर, 24 जुलै, (हिं.स.)। जिल्हाधिकारी कार्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे जायकवाडी पक्षी अभयारण्य संवेदनशील क्षेत्र मॉनिटरिंग समितीच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी बैठक पार पडली.

या बैठकीत जायकवाडी पक्षी अभयारण्य परिसरातील पर्यावरणीय संवर्धन, जैवविविधतेचे संरक्षण तसेच संवेदनशील क्षेत्रातील विविध विकासकामे, स्थानिक नागरिकांच्या अडचणी आणि शासनाच्या अधिसूचनेनुसार राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. तसेच, अभयारण्य परिसरातील पारंपरिक मत्स्यव्यवसाय करणाऱ्या मच्छीमार बांधवांच्या उपजीविकेवर कोणताही प्रतिकूल परिणाम होणार नाही, यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याबाबत चर्चा करण्यात आली. पर्यावरण संरक्षण आणि स्थानिकांच्या उपजीविकेचा समतोल राखत शासनाच्या नियमांचे प्रभावीपणे पालन करण्याच्या दृष्टीने विविध मुद्द्यांवर संबंधित विभागांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.

या बैठकीस संबंधित विभागांचे अधिकारी, जायकवाडी पक्षी अभयारण्य प्रशासनाचे प्रतिनिधी, मॉनिटरिंग समितीचे सदस्य तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande