सोनपेठात 28 जुलैला मोफत नेत्रतपासणी शिबिर
परभणी, 24 जुलै (हिं.स.)। लोकनेते स्व. अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त पाथरी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांसाठी आमदार राजेश विटेकर यांच्या संकल्पनेतून मंगळवार 28 जुलै रोजी सोनपेठ येथील ग्रामीण रुग्णालयात सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत मोफत नेत्रतपासणी
सोनपेठात 28 जुलैला मोफत नेत्रतपासणी शिबिर


परभणी, 24 जुलै (हिं.स.)। लोकनेते स्व. अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त पाथरी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांसाठी आमदार राजेश विटेकर यांच्या संकल्पनेतून मंगळवार 28 जुलै रोजी सोनपेठ येथील ग्रामीण रुग्णालयात सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत मोफत नेत्रतपासणी व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या शिबिरामध्ये ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांची मोफत नेत्र तपासणी करण्यात येणार असून, मोतीबिंदू आढळून आलेल्या रुग्णांवर आवश्यकतेनुसार मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. तसेच दृष्टीदोष असलेल्या नागरिकांच्या डोळ्यांच्या नंबरची तपासणी करून पात्र लाभार्थ्यांना मोफत चष्मे उपलब्ध करून दिले जाणार आहेत. याशिवाय गरजू रुग्णांना आवश्यक औषधांचेही विनामूल्य वितरण करण्यात येणार आहे. या आरोग्य शिबिरात अनुभवी नेत्ररोग तज्ज्ञांकडून नागरिकांची तपासणी करण्यात येणार असून, नेत्रविकारांबाबत मार्गदर्शनही केले जाणार आहे. आर्थिक परिस्थितीमुळे उपचारापासून वंचित राहणार्या नागरिकांसाठी हा उपक्रम उपयुक्त ठरणार आहे. शिबिराचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी आधार कार्ड व मोबाईल क्रमांक सोबत आणावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. पाथरी विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांनी या मोफत आरोग्य शिबिराचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.‘आरोग्याची नवी आशा... आरोग्य साधना’ या संकल्पनेतून आयोजित करण्यात येत असलेल्या या शिबिराच्या अधिक माहितीसाठी पंचायत समिती उपसभापती पद्मसिंह देशमुख, नगरसेवक बळीराम काटे, नगरसेवक कल्पेश राठोड, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अशोक भुसारे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक रामेश्वर मोकाशे, मदनराव सपकाळ, आसिफ शेख व अमोल बचाटे यांच्याशी संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande