श्री क्षेत्र गहिनीनाथ गड ते पंढरपूर पायी दिंडी पंढरपुरात दाखल
बीड, 24 जुलै (हिं.स.)।श्री क्षेत्र गहिनीनाथ गड ते पंढरपूर पायी दिंडी पंढरपुरात दाखल झाल्यानंतर सालाबादप्रमाणे वारकरी भाविकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या भव्य महापंगती सोहळ्याचे आयोजन करण्यात येते.यावेळी अन्नदानाच्या माध्यमातून उपस्थित वारकऱ्यांची से
अ


बीड, 24 जुलै (हिं.स.)।श्री क्षेत्र गहिनीनाथ गड ते पंढरपूर पायी दिंडी पंढरपुरात दाखल झाल्यानंतर सालाबादप्रमाणे वारकरी भाविकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या भव्य महापंगती सोहळ्याचे आयोजन करण्यात येते.यावेळी अन्नदानाच्या माध्यमातून उपस्थित वारकऱ्यांची सेवा करण्याचे भाग्य लाभते. अशी माहिती आमदार सुरेश धस यांनी दिली आहे. या दिंडीचे स्वागत आमदार सुरेश धस यांनी केले

यावेळी गहिनीनाथ गडाचे महंत ह.भ.प. विठ्ठल महाराज यांचे आशीर्वाद घेतले तसेच अन्नपूर्णा देवतेचे पूजन करून महापंगतीस प्रारंभ करण्यात आला. विठ्ठलनामाच्या अखंड गजरात हजारो वारकरी भाविकांची सेवा करण्याचा हा भक्तिमय सोहळा अनुभवण्याचे भाग्य या निमित्ताने लाभते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande