
छत्रपती संभाजीनगर, 24 जुलै, (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षासाठी दहा लाख रुपयांची देणगी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी करिता जनार्दन विधाते, निवासी उपजिल्हाधिकारी, छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे सुपूर्द केला.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू रुग्णांना वेळेवर उपचारासाठी आर्थिक मदत मिळावी, या सामाजिक बांधिलकीतून त्यांनी ही देणगी दिली. मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षामार्फत राज्यातील हजारो गरजू रुग्णांना उपचारासाठी आर्थिक सहाय्य दिले जात असून, समाजातील दात्यांच्या अशा योगदानामुळे या उपक्रमाला अधिक बळ मिळत आहे. यावेळी मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या वतीने हर्षवर्धन जाधव यांचे या सामाजिक योगदानाबद्दल आभार व्यक्त करण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis