अमरावती जिल्ह्यात खरिपाची पेरणी ९० टक्क्यांवर
अमरावती, 24 जुलै (हिं.स.) । खरीप हंगामाची पेरणी जवळपास आटोपत आली असून जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पेरणी क्षेत्राच्या ९० टक्के क्षेत्रातील पेरण्या आटोपल्या आहेत. ७१ हजार ४५३ हेक्टर क्षेत्र अद्यापही नापेर असून त्यामध्ये किंचित वाढ होण्याची शक्यता आहे. स
जिल्ह्यात खरिपाची पेरणी ९० टक्क्यांवर


अमरावती, 24 जुलै (हिं.स.) । खरीप हंगामाची पेरणी जवळपास आटोपत आली असून जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पेरणी क्षेत्राच्या ९० टक्के क्षेत्रातील पेरण्या आटोपल्या आहेत. ७१ हजार ४५३ हेक्टर क्षेत्र अद्यापही नापेर असून त्यामध्ये किंचित वाढ होण्याची शक्यता आहे. सोयाबीनच्या क्षेत्रात यंदा लक्षणीय प्रमाणात घट झाली असून कापसाखाली अडीच लाख हेक्टरवरून अधिक क्षेत्र आले आहे. मूग व उडीद पिके नामशेष होण्याच्या मार्गावर आली आहेत.

नुकत्याच झालेल्या पावसाने पिकांना संजीवनी मिळाली असून जिल्ह्यातील पीकस्थिती उत्तम असल्याचे कृषी विभागाने म्हटले आहे. यंदा खरीप हंगामात ‘एल निनो’चा प्रभाव व सोयाबीनच्या बोगस बियाण्यांचा परिणाम दिसून आला आहे. पहिल्या पेरणीनंतर पावसाने दडी मारल्याने पिके धोक्यात आली होती. तथापि नुकत्याच बरसलेल्या आषाढ सरींनी पिकांना संजीवनी मिळाली आहे. दरम्यान, आतापर्यंत जिल्ह्यातील ९० टक्के क्षेत्रातील पेरणी आटोपली आहे. एकूण सरासरी सहा लाख ८२ हजार ९९२ हेक्टर क्षेत्र पेरणीयोग्य असून सहा लाख ११ हजार ५३९ हेक्टर क्षेत्रात पेरण्या झाल्या आहेत. सोयाबीन, कापूस व तूर ही खरीप हंगामातील मुख्य पिके असून यंदा सोयाबीनच्या क्षेत्रात लक्षणीय घट झाल्याचे दिसून आले आहे. एक लाख ९७ हजार ५८५ हेक्टर क्षेत्रात सोयाबीनची, तर दोन लाख ५८ हजार ९९७ हेक्टरमध्ये शेतकऱ्यांनी कपाशीची पेरणी केली आहे. तुरीच्या पेरणीखाली कमी क्षेत्र आले असले तरी बोगस बियाण्यांमुळे उगवण न झालेल्या सोयाबीनच्या क्षेत्रात तुरीची पेरणी होण्याची शक्यता आहे. मक्याखाली ३६ हजार ९१५ हेक्टर क्षेत्र आले आहे.

खरिपातील पेरणी (हेक्टर) एकूण सरासरी क्षेत्र ६, ८२, ९९२ एकूण पेरणी ६, ११, ५३९ सरासरी ९० टक्के कापूस २, ५८, ९९७ सोयाबीन १, ९७, ५८५ तूर १, ०७, ९५८ मका ३६, ९१५ मूग ४९९ उडीद ५०७

---------------------------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande