बारावी उत्तीर्ण झालेल्या अल्पवयीन मुलीचे अपहरण ; अज्ञातावर गुन्हा
बीड, 24 जुलै (हिं.स.)। घराच्या व्हरांड्यात झोपलेल्या बारावी उत्तीर्ण असलेल्या अल्पवयीन मुलीचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची घटना कोरडेवाडी ता. केज येथे घडली. याप्रकरणी अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. कोरडेवाडी ता. केज य
केज पोलीस ठाण्यात गुन्हा


बीड, 24 जुलै (हिं.स.)।

घराच्या व्हरांड्यात झोपलेल्या बारावी उत्तीर्ण असलेल्या अल्पवयीन मुलीचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची घटना कोरडेवाडी ता. केज येथे घडली. याप्रकरणी अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

कोरडेवाडी ता. केज येथील १७ वर्षे ११ महिने ७ दिवस वयाची अल्पवयीन मुलगी व तिचा भाऊ हे २१ जुलै रोजी रात्री १० वा. जेवण आटोपून घराच्या व्हरांड्यात झोपले होते. रात्री या मुलीचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याचे उघडकीस आले. तिच्या आई-वडिलांनी परिसरासह नातेवाईकांकडे तिचा शोध घेतला मात्र तिचा तपास लागला नाही. तिच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारी वरून फिर्यादी वरून अज्ञात व्यक्ती विरुद्ध केज पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण उंबरे हे पुढील तपास करीत आहेत. अज्ञात व्यक्तीने अपहरण करण्यात आलेल्या अल्पवयीन मुलीचा रंग गोरा असून उंची चार फूट पाच इंच आहे. तिच्या अंगात पिवळ्या रंगाचा टॉप व जिन्स पॅन्ट असून पायात सॅन्डल आहे. अशा वर्णनाची मुलगी आढळून आल्यास केज पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन एपीआय लक्ष्मण उंबरे यांनी केले आहे

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande