
अमरावती, 24 जुलै (हिं.स.) : आगामी गणेशोत्सव, पोळा, गोकुळाष्टमी, ईद आदी सण-उत्सव शांततेत, सलोख्याच्या वातावरणात आणि उत्साहात पार पडावेत, यासाठी वलगाव पोलिस ठाण्यात हद्दीतील पोलिस पाटलांची बैठक घेण्यात आली. पोलिस उपायुक्त (परिमंडळ-एक) यशवंत सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली वलगाव पोलिस ठाण्याच्या सभागृहात ही बैठक पार पडली.
बैठकीत गावांमधील कायदा व सुव्यवस्था, स्थानिक अडीअडचणी तसेच सामाजिक सलोखा कायम राखण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक रीता उईके यांनी गावांमध्ये घडणाऱ्या संशयास्पद हालचाली, वादविवाद किंवा कायदा-सुव्यवस्थेला बाधा पोहोचविणाऱ्या कोणत्याही घटनेची माहिती तत्काळ वलगाव पोलिस ठाण्याला देण्याचे आवाहन पोलिस पाटलांना केले. तसेच पोलिस पाटलांच्या अडचणी जाणून घेत त्यावरील उपाययोजनांबाबतही चर्चा करण्यात आली. बैठकीला टाकरखेडासंभू, साऊर, शिराळा, गोपाळपूर, निमखेडा, जावरा, विर्शी, खारतळेगाव, कामुंजा, कुंड, हातखेडा, कळमगव्हाण, दस्तरापूर, देवरी निपाणी, आमला, आष्टी, नांदुरा बु., सावरखेडा, वझरखेड, रामा, नारायणपूर, सुलतानपूर, थुगाव, नया अकोला, रेवसा, पुसदा, वायगाव, सालोरा बु. आणि मक्रमपूर येथील पोलिस पाटील उपस्थित होते.
----------------------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी