मुलुंड स्थानकावर पादचारी पुलासाठी गर्डर लाँच करण्यासाठी विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक
मुंबई, 24 जुलै (हिं.स.) - दिनांक २५/२६.०७.२०२६ (शनिवार/रविवार) च्या मध्यरात्री, मध्य रेल्वेद्वारे मुलुंड स्थानकावर किमी ३०/१२२ ते ३०/१०८ दरम्यान, प्लॅटफॉर्म क्रमांक १ आणि प्लॅटफॉर्म क्रमांक २/३ दरम्यानच्या स्पॅन-१ वर आणि प्लॅटफॉर्म क्रमांक २/३ आणि
Mulund


मुंबई, 24 जुलै (हिं.स.) - दिनांक २५/२६.०७.२०२६ (शनिवार/रविवार) च्या मध्यरात्री, मध्य रेल्वेद्वारे मुलुंड स्थानकावर किमी ३०/१२२ ते ३०/१०८ दरम्यान, प्लॅटफॉर्म क्रमांक १ आणि प्लॅटफॉर्म क्रमांक २/३ दरम्यानच्या स्पॅन-१ वर आणि प्लॅटफॉर्म क्रमांक २/३ आणि ४ दरम्यानच्या स्पॅन-२ वर ६ मीटर रुंद पादचारी पुलासाठी गर्डर २५० एमटी क्रेनद्वारे लाँच करण्यासाठी विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येईल .

ब्लॉकची तारीख: दिनांक २५/२६.०७.२०२६ (शनिवार/रविवार रात्रीची वेळ)

ब्लॉकचा कालावधी आणि तपशील:

अप आणि डाउन धीम्या मार्गावर ०१.१० ते ०३.४०,

अप आणि डाउन जलद मार्गावर ०१.१० ते ०२.१०,

ट्रॅफिक ब्लॉक विभाग: मुलुंड ते ठाणे पर्यंतच्या अप आणि डाउन धीम्या आणि जलद मार्ग (मुलुंड स्थानकासह आणि ठाण्याजवळील क्रॉस ओव्हर वगळून).

उपनगरीय लोकलवरील परिणाम :-

रद्द गाड्या:

दिनांक २५.०७.२०२६ रोजी ००.२४ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - ठाणे उपनगरीय लोकल टी-१ आणि

दिनांक २६.०७.२०२६ रोजी ०४.०४ वाजता ठाणे येथून सुटणारी ठाणे - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस उपनगरीय लोकल टी-२ रद्द करण्यात येईल.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande