मुंबई प्रवासी आरक्षण प्रणाली - 'स्टॅटिक' आणि 'डायनॅमिक' फाइल्सच्या कॉम्प्रेशनसाठी प्रणाली राहणार बंद
मुंबई, 24 जुलै (हिं.स.) - ''स्टॅटिक'' आणि ''डायनॅमिक'' फाइल्सच्या कॉम्प्रेशनच्या कामासाठी मुंबई पीआरएस प्रणाली दिनांक २५.०७.२०२६ रोजी रात्री २३:४५ वाजल्यापासून दिनांक २६.०७.२०२६ रोजी पहाटे ०३:१५ वाजेपर्यंत बंद राहील. या कालावधीत पीआरएस सेवा,
मुंबई प्रवासी आरक्षण प्रणाली - 'स्टॅटिक' आणि 'डायनॅमिक' फाइल्सच्या कॉम्प्रेशनसाठी प्रणाली राहणार बंद


मुंबई, 24 जुलै (हिं.स.) - 'स्टॅटिक' आणि 'डायनॅमिक' फाइल्सच्या कॉम्प्रेशनच्या कामासाठी मुंबई पीआरएस प्रणाली दिनांक २५.०७.२०२६ रोजी रात्री २३:४५ वाजल्यापासून दिनांक २६.०७.२०२६ रोजी पहाटे ०३:१५ वाजेपर्यंत बंद राहील.

या कालावधीत पीआरएस सेवा, कोच-संबंधित परतावा सेवा आणि आयव्हीआरएस, चालू आरक्षण, चार्ट डिस्प्ले, टच स्क्रीन, परतावा खिडक्या व परतावा टर्मिनल इत्यादी सेवा उपलब्ध नसतील. तथापि, विद्यमान परतावा नियमांनुसार परताव्यासाठी टीडीआर जारी केला जाईल.

वर नमूद केलेल्या कालावधीत मुंबई पीआरएस अंतर्गत येणाऱ्या गाड्यांसाठी इंटरनेटद्वारे आरक्षण सुविधा उपलब्ध नसेल.

या महत्त्वाच्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे, अशी विनंती प्रवाशांना करण्यात येत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande