छ. संभाजीनगर - २३ वर्षांखालील तरुणांना कौशल्य सादर करण्याची संधी
छत्रपती संभाजीनगर, 24 जुलै, (हिं.स.)। जगातील सर्वात मोठ्या कौशल्य स्पर्धांपैकी एक असलेल्या ''इंडिया स्किल कॉम्पिटिशन २०२६-२७'' मध्ये सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील तरुणांना सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.व्यावसायिक शिक्षण व कौशल्य उत्कृष्टतेला प्रोत्स
छ. संभाजीनगर - २३ वर्षांखालील तरुणांना कौशल्य सादर करण्याची संधी


छत्रपती संभाजीनगर, 24 जुलै, (हिं.स.)। जगातील सर्वात मोठ्या कौशल्य स्पर्धांपैकी एक असलेल्या 'इंडिया स्किल कॉम्पिटिशन २०२६-२७' मध्ये सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील तरुणांना सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.व्यावसायिक शिक्षण व कौशल्य उत्कृष्टतेला प्रोत्साहन देणारी ही स्पर्धा ऑलिम्पिकच्या धर्तीवरील प्रतिष्ठित स्पर्धा मानली जाते.

जगभरातील २३ वर्षांखालील तरुणांना आपल्या कौशल्याचे सादरीकरण करण्याची संधी या स्पर्धेत मिळणार असून,भारत सरकारच्या नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कौन्सिलच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे.

स्पर्धेच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने २०२६ मध्ये ६३ क्षेत्रांशी संबंधित जिल्हा व राज्यस्तरीय कौशल्य स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे.व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय,सेक्टर स्किल कौन्सिल तसेच विविध औद्योगिक आस्थापनांच्या सहकार्याने या स्पर्धा पार पडणार आहेत.

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी https://www.skillindiadigital.gov.in या संकेतस्थळावर भेट देऊन ऑनलाइन नोंदणी करावी.जिल्हा, विभाग,राज्य आणि देशपातळीवरील स्पर्धांमधून निवड झालेल्या उमेदवारांची नावे पुढील जागतिक नामांकनासाठी पाठविण्यात येणार आहेत.

जागतिक कौशल्य स्पर्धा २०२६ साठी वयोमर्यादा हा एकमेव निकष असून,सर्वसाधारण स्पर्धांसाठी उमेदवाराचा जन्म १ जानेवारी २००३ किंवा त्यानंतरचा असणे आवश्यक आहे.तर Digital Construction, Cloud Computing, Additive Manufacturing, Cyber Security, ICT Network Infrastructure, Industrial Design Technology, Industry 4.0, Information Network Cabling, Mechatronics, Optoelectronic Technology, Robot System Integration, Water Technology, Dental Prosthetics आणि Aircraft Maintenance या क्षेत्रांमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवाराचा जन्म १ जानेवारी २००१ किंवा त्यानंतरचा असणे अनिवार्य आहे.

जिल्हा,विभाग,राज्य आणि देशपातळीवरून प्रतिभासंपन्न व कुशल उमेदवारांची निवड करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात येणाऱ्या या स्पर्धेत सर्व आयटीआय (ITI),पॉलिटेक्निक, MSME Tool Rooms, CIPETS, IIT,अभियांत्रिकी महाविद्यालये,महाराष्ट्र स्टेट स्किल युनिव्हर्सिटी,MSBVET, खासगी कौशल्य विद्यापीठे,ललित कला महाविद्यालये, Flower Training Institute,Institute of Jewelry Making,विविध प्रशिक्षण संस्था,कौशल्य संस्था आणि व्यावसायिक प्रशिक्षण संस्थांमध्ये शिक्षण घेणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे,असे आवाहन सहायक आयुक्त,कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,धाराशिव यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande