पुणे जिल्हा बँकेसाठी ऐतिहासिक निर्णय; ६५० कोटींच्या बाँड्सला आरबीआयचा हिरवा कंदील
पुणे, 24 जुलै, (हिं.स.)। भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला (पीडीसीसी) ६५० कोटी रुपयांचे बाँड्स उभारण्यास मंजुरी दिली असून, हा निर्णय बँकेच्या इतिहासातील महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. या परवानगीमुळे बँकेच्या
पुणे जिल्हा बँकेसाठी ऐतिहासिक निर्णय; ६५० कोटींच्या बाँड्सला आरबीआयचा हिरवा कंदील


पुणे, 24 जुलै, (हिं.स.)। भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला (पीडीसीसी) ६५० कोटी रुपयांचे बाँड्स उभारण्यास मंजुरी दिली असून, हा निर्णय बँकेच्या इतिहासातील महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. या परवानगीमुळे बँकेच्या दीर्घकालीन विकासाचा पाया अधिक भक्कम होणार असून, बँकेने आजवर जपलेली आर्थिक विश्वासार्हता, सातत्यपूर्ण प्रगती आणि सक्षम व्यवस्थापनाची ही पावती असल्याचे मत महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी व्यक्त केले.

पीडीसीसी बँकेच्या 'पर्पेच्युअल डेट इन्स्ट्रुमेंट (PDI)' आणि 'लाँग टर्म सबऑर्डिनेटेड बाँड्स (LTSB)' योजनेचा शुभारंभ बँकेच्या मुख्यालयातील स्व. यशवंतराव चव्हाण सभागृहात अनास्कर यांच्या हस्ते झाला. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.कार्यक्रमाच्या प्रारंभी स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पीडीसीसी बँकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे होते.यावेळी जिल्हा उपनिबंधक प्रकाश जगताप (पुणे ग्रामीण), बँकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे, संचालक प्रवीण शिंदे, अशोक पवार, संजय काळे, विकास दांगट, भालचंद्र जगताप, निर्मला जागडे, पूजा बुट्टे पाटील तसेच प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संजय शितोळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.अनास्कर यांनी सांगितले की, आरबीआयची ही मंजुरी पीडीसीसी बँकेच्या आर्थिक स्थैर्याची आणि विश्वासार्हतेची साक्ष असून, भविष्यात सहकार क्षेत्रातील विकास प्रकल्पांना वित्तपुरवठा करण्यासाठी बँकेची क्षमता अधिक सक्षम होणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande