छ. संभाजीनगर - पैठण-आपेगाव विकास प्राधिकरणाच्या विविध विकासकामांचा आढावा
छत्रपती संभाजीनगर, 24 जुलै (हिं.स.)। पैठण विधानसभा मतदारसंघातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व पैठण-आपेगाव विकास प्राधिकरणाच्या विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालय, छत्रपती संभाजीन
अ


छत्रपती संभाजीनगर, 24 जुलै (हिं.स.)। पैठण विधानसभा मतदारसंघातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व पैठण-आपेगाव विकास प्राधिकरणाच्या विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे आढावा बैठक पार पडली. बैठकीत सुरू असलेल्या प्रकल्पांच्या प्रगतीचे परीक्षण करताना प्रलंबित कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. नागरिकांना दर्जेदार व अखंड पाणीपुरवठा तसेच मूलभूत सुविधा प्रभावीपणे उपलब्ध व्हाव्यात, यासाठी आवश्यक उपाययोजनांवरही चर्चा झाली.

विकासकामांमध्ये गुणवत्ता, पारदर्शकता आणि वेळेचे नियोजन यांना प्राधान्य देत संबंधित विभागांमध्ये समन्वय वाढवण्यावर भर देण्यात आला. पैठणच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासनाची ही सकारात्मक पावले निश्चितच नागरिकांच्या हिताची ठरणार आहेत.

पैठण शहरातील एसटीपी (STP) प्रकल्प, ड्रेनेज लाईन व सांडपाणी व्यवस्थापनाची सद्यस्थिती

•् महाराष्ट्र जीवन प्राधिकरणांतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनांची प्रगती, निधी व प्रलंबित कामांचा सविस्तर आढावा.घेण्यात आला

• पैठण नगर परिषद हद्दवाढ प्रस्तावाची सद्यस्थिती, आवश्यक प्रशासकीय कार्यवाही व पुढील प्रक्रिया.

• पैठण-आपेगाव विकास प्राधिकरणांतर्गत टप्पा क्रमांक ३ विकासकामांची प्रगती आणि प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याबाबत सूचना.

• पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारीतील बारव, प्राचीन मंदिरे व ऐतिहासिक वारसा स्थळांचे संवर्धन, दुरुस्ती आणि पर्यटन विकासासाठी आवश्यक उपाययोजना.

• कै. बाळासाहेब पाटील वस्तुसंग्रहालयाच्या विस्तारीकरणाचा प्रस्ताव, निधी उपलब्धता व कामाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे

• सर्व विभागांनी परस्पर समन्वय ठेवून गुणवत्तापूर्ण, वेळेत आणि नियोजनबद्ध पद्धतीने विकासकामे पूर्ण करण्याबाबत निर्देेशही दिले

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande