विरोधकांकडून संसदेचे कामकाज ठप्प ठेवण्याचा प्रयत्न सुरू - खा. अशोक चव्हाण
नांदेड, 24 जुलै, (हिं.स.)। नीट प्रकरणात केंद्र सरकारने तातडीने कारवाई करत दोषींवर कठोर कारवाईची प्रक्रिया सुरू झाली आणि सोनम वांगचुक यांनीही उपोषण मागे घेतले. तरीही विरोधकांकडून संसदेचे कामकाज ठप्प ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे. असा आरोप भारतीय जनता प
विरोधकांकडून संसदेचे कामकाज ठप्प ठेवण्याचा प्रयत्न सुरू - खा. अशोक चव्हाण


नांदेड, 24 जुलै, (हिं.स.)। नीट प्रकरणात केंद्र सरकारने तातडीने कारवाई करत दोषींवर कठोर कारवाईची प्रक्रिया सुरू झाली आणि सोनम वांगचुक यांनीही उपोषण मागे घेतले. तरीही विरोधकांकडून संसदेचे कामकाज ठप्प ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे. असा आरोप भारतीय जनता पक्षाचे खासदार माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केला आहे.

लोकशाहीत प्रश्नांचे उत्तर गोंधळातून नव्हे, तर संसदेतील सविस्तर चर्चेतून मिळते. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित विषयांवर सकारात्मक चर्चा होऊन प्रभावी निर्णय व्हावेत, हीच देशाची अपेक्षा आहे. या शब्दात खासदार अशोक चव्हाण यांनी आपले मत व्यक्त केले दिल्लीमध्ये जे काही घडते आहे ते चुकीचे आहे सगळं काही सरकार व्यवस्थित करीत आहे असेही त्यांनी सांगितले आहे

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande