
छत्रपती संभाजीनगर, 24 जुलै (हिं.स.)। भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा प्रणीता देवरे-चिखलीकर यांनी भाजपा बदनापूर संपर्क कार्यालय येथे सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांचा सत्कार जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालिका शितल नारायण कुचे यांच्या हस्ते करण्यात आला.
या प्रसंगी भाजपा महिला मोर्चा जालना जिल्हाध्यक्षा तथा जालना महानगरपालिका सभापती संध्या देठे आणि बदनापूर महिला मोर्चा तालुकाध्यक्षा अश्विनी पवार उपस्थित होत्या.
भेटीदरम्यान पक्ष संघटन अधिक बळकट करणे, महिला सक्षमीकरण, केंद्र व राज्य शासनाच्या लोककल्याणकारी योजनांचा लाभ तळागाळातील महिलांपर्यंत पोहोचविणे तसेच स्थानिक कार्यकर्त्यांशी विविध संघटनात्मक विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
या सदिच्छा भेटीमुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, महिला मोर्चाच्या माध्यमातून समाजहिताचे उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis