पुण्यात सध्या पाणीकपात नाही; धरणसाठा २०.५० टीएमसीवर
पुणे, 24 जुलै (हिं.स.)। पुणे शहरातील नागरिकांना सध्या नियमित पाणीपुरवठा करण्यात येत असून, कोणत्याही प्रकारची पाणीकपात लागू करण्यात आलेली नसल्याची माहिती पुणे महानगरपालिकेच्या महापौर मंजूषा नागपुरे यांनी दिली. महापौर नागपुरे यांनी सांगितले की, शहर
pmc


पुणे, 24 जुलै (हिं.स.)।

पुणे शहरातील नागरिकांना सध्या नियमित पाणीपुरवठा करण्यात येत असून, कोणत्याही प्रकारची पाणीकपात लागू करण्यात आलेली नसल्याची माहिती पुणे महानगरपालिकेच्या महापौर मंजूषा नागपुरे यांनी दिली.

महापौर नागपुरे यांनी सांगितले की, शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठा आणि २२ जुलैनंतरची पावसाची स्थिती लक्षात घेऊन पाणीकपात पुन्हा सुरू करायची की नाही, याबाबत निर्णय घेण्यात येणार होता. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून शहरासह धरणक्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्याने सध्या तरी नियमित पाणीपुरवठ्यात कोणतीही कपात केली जाणार नाही.

दरम्यान, शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणसाखळी परिसरात मुसळधार पाऊस सुरू असल्याने धरणांतील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. गेल्या २४ तासांत धरणांमध्ये सुमारे दोन टीएमसी पाण्याची भर पडली असून, एकूण उपयुक्त पाणीसाठा २०.५० टीएमसीवर पोहोचला आहे.

धरणांतील वाढत्या पाणीसाठ्यामुळे पुणे शहराच्या वर्षभराच्या पाणीपुरवठ्याची चिंता मोठ्या प्रमाणात दूर झाली आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास धरणांमधून टप्प्याटप्प्याने पाणी सोडण्याचे नियोजन जलसंपदा विभागाने केले असल्याची माहितीही प्रशासनाने दिली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande