परभणी - आरपी हॉस्पिटलची किमया; बधिर तरुणाची परतली श्रवणशक्ती
परभणी, 24 जुलै (हिं.स.)। वयाच्या अवघ्या ३५ व्या वर्षी बहिरेपणाच्या समस्येने ग्रासलेल्या तरुणाची श्रवण शक्ती परभणीच्या आरपी हॉस्पिटलमधील तज्ञ डॉक्टरांच्या कौशल्यामुळे परत मिळाली. परभणी येथील हा तरुण बऱ्याच दिवसांपासून कानातून पू व पाणी येणे, सतत का
अ


परभणी, 24 जुलै (हिं.स.)। वयाच्या अवघ्या ३५ व्या वर्षी बहिरेपणाच्या समस्येने ग्रासलेल्या तरुणाची श्रवण शक्ती परभणीच्या आरपी हॉस्पिटलमधील तज्ञ डॉक्टरांच्या कौशल्यामुळे परत मिळाली.

परभणी येथील हा तरुण बऱ्याच दिवसांपासून कानातून पू व पाणी येणे, सतत कान दुखणे आणि हळूहळू ऐकू येणे, ऐकू कमी येणे या त्रासाने त्रस्त होता. दुर्बिणीतून कानाची तपासणी केल्यानंतर प्राथमिक समस्या स्पष्ट झाल्या. श्रवण क्षमता तपासणीसाठी ऑडिओमेट्री विभागात तपासणी दरम्यान रुग्णाला फक्त १०% ऐकता येत असल्याचे निष्पन्न झाले. या गंभीर आजारामुळे आणि उपचारांच्या वाढत्या खर्चाला कंटाळून रुग्ण अखेर आरपी हॉस्पिटलमध्ये दाखल झाला. येथे कान, नाक, घसातज्ज्ञ डॉ. मोहम्मद फैज उर रहमान यांनी अत्यंत कुशलतेने ही क्लिष्ट शस्त्रक्रिया दोन टप्प्यांत यशस्वीरीत्या पूर्ण केली.

पहिल्या टप्प्यात एका कानाचे आजाराचे यशस्वी निदान करून त्यात नवीन कृत्रिम कान पडदा बसविण्यात आला. पहिला कान ठीक झाल्यानंतर दुसरा कानाच्या शास्तक्रियेचा टप्पा यशस्वी पार पडली. दोन्ही कानाच्या शस्त्रक्रियेमधे दोन महिन्यांचा काळ गेला. दुसऱ्या कानाचे ऑपरेशन यशस्वी झाले. सामान्यतः अशा क्लिष्ट व दोन टप्प्यातील शस्त्रक्रियांसाठी रुग्णाला मोठा आर्थिक भार सहन करावा लागतो. मात्र, रुग्णाची आर्थिक परिस्थिती आणि तरुण वयात आलेले वैद्यकीय संकट लक्षात घेता आरपी हॉस्पिटलने ही शस्त्रक्रिया अत्यल्प दरात पूर्ण करून सामाजिक जाणीव जोपासली.

परभणी शहरात अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया अत्यंत अल्पदरात करणे हे सामाजिक बांधिलकी म्हणून आरपी हॉस्पिटलचे कर्तव्य आहे. समाजातील दुर्लक्षित रुग्णाला अंधारातून बाहेर काढून त्याला नवीन आयुष्य देण्याचे मोलाचे कार्य हॉस्पिटलने केले असून या टीमच आमदार डॉ. राहुल पाटील प्रमुख, आरपी हॉस्पिटल यांनी अभिनंदन केले आहे

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande