
लातूर, 24 जुलै (हिं.स.)।लातूर शहरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ऑटो रिक्षाचालकांविरोधात लातूर पोलीस व प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) संयुक्त धडक कारवाई करत ३९ ऑटोचालकांवर कारवाई केली. या कारवाईत संबंधित चालकांकडून एकूण १ लाख ३० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
शहरात वाढती वाहतूक, वाहतूक कोंडी आणि नियमभंगाच्या घटनांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत असल्याने ही विशेष मोहीम राबविण्यात आली. काही ऑटो रिक्षाचालकांनी वाहनात अनधिकृत बदल करून चालकाच्या समोरील जागेत लोखंडी किंवा फायबरची शीट बसवून प्रवाशांची वाहतूक सुरू केली होती. अपघात झाल्यास समोरील प्रवाशांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन लातूर पोलीस विभागाने या प्रकाराची गंभीर दखल घेतली.
याबाबत लातूर पोलीस विभागाने प्रादेशिक परिवहन कार्यालयाशी समन्वय साधून संयुक्त तपासणी मोहीम राबविली. शहरातील विविध भागांत करण्यात आलेल्या तपासणीत ३९ ऑटो रिक्षांमध्ये अनधिकृत बदल करून चालकाच्या समोरील जागेत प्रवासी बसविल्याचे आढळून आले. संबंधित वाहनांवर मोटार वाहन कायद्यातील कलम १९८ अन्वये कारवाई करण्यात आली.
या संयुक्त मोहिमेत आरटीओचे चार अधिकारी व चार अंमलदार तसेच लातूर पोलीस विभागाकडून सिटी विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक नियंत्रण शाखेचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.
लातूर पोलीस विभागाने सर्व ऑटो रिक्षाचालकांना वाहनांमध्ये कोणतेही अनधिकृत बदल न करण्याचे, वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आणि केवळ नियमानुसारच प्रवाशांची वाहतूक करण्याचे आवाहन केले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध भविष्यातही अशाच प्रकारच्या कठोर संयुक्त कारवाया सुरू राहणार असल्याचा इशाराही देण्यात आल
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis