
छत्रपती संभाजीनगर, 24 जुलै, (हिं.स.)। नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्यातून तब्बल 88,935 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असून, पाण्याच्या विसर्गात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गोदावरी नदीकाठच्या सर्व शेतकरी बांधवांनी व नागरिकांनी सतर्क राहावे, नदीपात्रात किंवा पुरग्रस्त भागात जाणे टाळावे, जनावरे व शेतीची अवजारे सुरक्षित ठिकाणी हलवावीत तसेच प्रशासनाने जारी केलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे.
नांदूर मध्यमेश्वर बंधा-यातून तब्बल 88,935 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला असून, त्यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गोदावरी नदीकाठच्या शेतकरी व नागरिकांनी सतर्क राहावे. नदीपात्रात, नदीकाठच्या भागात किंवा धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे .
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis