
अमरावती, 24 जुलै (हिं.स.) उमरखेड शहरातील खडकपुरा चौकात नगर परिषद संकुलात असलेली सार्वजनिक प्रसाधनगृह कायमचे बंद करण्यात यावे, अशा मागणीची निवेदन खडकपुरा परिसरातील व्यापार्यांनी मुख्याधिकारी तथा आरोग्य सभापती यांना दिले आहे. व्यापारी महिला व नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असल्याने ही तक्रार करण्यात आली आहे.
उमरखेडच्या खडकपुरा परिसरात शहीद चौकात नगर परिषदेने संकुल उभे केले आहे. त्याच संकुलात सार्वजनिक प्रसाधनगृह उभारले असून त्याची देखभाल व्यवस्थित होत नसल्याने घाणीचा प्रचंड त्रास व्यापार्!यांना होत आहे. सार्वजनिक प्रसाधनगृह व मुतारी नेहमीच अस्वच्छ राहते. त्यामधून दुर्गंधीचा अति उग्रवास रस्त्यावर येत असल्याने त्याचा त्रास नेहमी व्यापारीवर्गाला व अवागमन करणार्!या नागरिकांना होत असतो. सार्वजनिक प्रसाधनगृह बंद असल्यास बाहेरच्या बाजूस लघुशंका करत असून त्याचा सर्वाधिक त्रास महिलावर्गाला होत आहे. त्यामुळे त्या भागात महिला ग्राहकसुद्धा येण्यास धजावत नाही. त्याचा परिणाम व्यवसायावर झाला आहे. सार्वजनिक प्रसाधनगृह कायमचे बंद करण्यात यावे, अशा आशयाची निवेदन व्यापार्!यांनी आरोग्य सभापती वीरेंद्र खंदारे व मुख्याधिकारी यांना दिले. यावेळी शहीद चौकातील सर्व व्यापारी उपस्थित होते.
----------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी