
परभणी, 24 जुलै (हिं.स.)।
पालकमंत्री श्रीमती मेघनाताई बोर्डीकर यांच्या आदेशान्वये जिल्ह्यात रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी सुमारे 500 ते 600 शेतकऱ्यांच्या ‘सिल्क व मिल्क’ शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
मेळावा रविवार, दि. 26 जुलै 2026 रोजी सकाळी 11 वाजता कृषी महाविद्यालयाच्या ऑडिटोरियम, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, येथे होणार आहे. कृषी विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, रेशीम विभाग आणि केंद्रीय रेशीम मंडळ, यांच्या संयुक्त विद्यमाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या मेळाव्यास उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा रेशीम विकास अधिकारी, यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis