लातूर शहर मतदारसंघात मतदार यादी अद्यावतीकरणासाठी सहकार्याचे आवाहन
लातूर, 24 जुलै, (हिं.स.)। भारत निवडणूक आयोग व मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या निर्देशानुसार २३५ लातूर शहर विधानसभा मतदारसंघाअंतर्गत मतदारयाद्या शंभर टक्के अद्यावत करण्यासाठी ''विशेष सखोल पुनरीक्षण'' (एसआयआर) मोहीम वेगाने राबवली जात आहे. या मोहिमेअं
एस आय आर


लातूर, 24 जुलै, (हिं.स.)। भारत निवडणूक आयोग व मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या निर्देशानुसार २३५ लातूर शहर विधानसभा मतदारसंघाअंतर्गत मतदारयाद्या शंभर टक्के अद्यावत करण्यासाठी 'विशेष सखोल पुनरीक्षण' (एसआयआर) मोहीम वेगाने राबवली जात आहे. या मोहिमेअंतर्गत सन २००२ च्या मतदारयादीशी मतदारांचे मॅपिंग (पडताळणी) करणे अनिवार्य असून, मॅपिंग न झाल्यास मतदारांना निवडणूक नोंदणी अधिकाऱ्यांसमोरील सुनावणी प्रक्रियेला सामोरे जावे लागू शकते, त्यामुळे सर्व मतदारांनी या मोहिमेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन लातूरच्या उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी लातूर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील मतदारांच्या मॅपिंगसाठी सर्व बूथ लेव्हल अधिकारी (बीएलओ) व पर्यवेक्षक घरोघरी जाऊन माहिती संकलन, अस्पष्ट छायाचित्रे अद्यावत करणे, डीएसई नोंदींची पडताळणी तसेच ईएफ (ईएफ) फॉर्मचे संकलन व डिजिटायझेशनचे काम ३० जून २०२६ ते ०८ ऑगस्ट २०२६ या कालावधीत पूर्ण करत आहेत. या कामाच्या सुलभतेसाठी तहसील कार्यालय येथे 'मतदार मदत कक्ष' आणि 'बीएलओ मदत कक्ष' उभारण्यात आले आहेत. उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे यांनी नुकतीच सर्व सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी व अतिरिक्त सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांची बैठक घेऊन कामकाजाचा आढावा घेतला तसेच प्रत्यक्ष यादी भाग ३१ ते ६० च्या बीएलओंची भेट घेऊन मार्गदर्शन केले व प्रत्यक्ष घरभेटी देऊन मतदारांना सहकार्याचे आवाहन केले.

भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या सुधारित वेळापत्रकानुसार २० ते २९ जून २०२६ दरम्यान बीएलओ प्रशिक्षण व यादी छपाई, ३० जून ते ०८ ऑगस्ट २०२६ दरम्यान घरोघरी जाऊन माहिती संकलन, १७ ऑगस्ट २०२६ रोजी प्रारूप मतदारयादी प्रसिद्धी, १७ ऑगस्ट ते १६ सप्टेंबर २०२६ दरम्यान दावे व हरकती स्वीकारणे, १७ ऑगस्ट ते १५ ऑक्टोबर २०२६ दरम्यान दावे-हरकती निकाली काढणे आणि १९ ऑक्टोबर २०२६ रोजी अंतिम मतदारयादी प्रसिद्ध केली जाणार आहे. याशिवाय मोजलेल्या मतदारांचे डिजिटायझेशन २८ जुलै २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे आणि अनुपस्थित, स्थलांतरित व मयत मतदारांच्या याद्या बीएलए यांना उपलब्ध करून देऊन त्यांचे इतिवृत्त प्रणालीवर अपलोड करण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत.

नागरिकांना voters.eci.gov.in या पोर्टलवरून घरबसल्या नाव तपासणे, बीएलओ व मतदान केंद्राची माहिती मिळवणे आणि ई-फॉर्म ऑनलाइन भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. याशिवाय, नागरिकांच्या सोयीसाठी सर्व बीएलओ दररोज सायंकाळी ४ ते ६ या वेळेत आपापल्या मतदान केंद्रांवर अनिवार्यपणे उपस्थित राहणार आहेत. मतदारांनी या वेळेत बीएलओंची भेट घेऊन ईएफ फॉर्म वाटप व डिजिटायझेशनची माहिती घ्यावी आणि मतदारयादी अद्यावत करण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे व तहसीलदार सौदागर तांदळे यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande