नांदेड जिल्ह्यातील अतिक्रमण हटविण्यासाठी कठोर कारवाईच्या सूचना
नांदेड, 24 जुलै (हिं.स.)। नांदेड जिल्ह्यातील अतिक्रमण हटविण्यासाठी कठोर कारवाई करावी अशी सूचना छत्रपती संभाजी नगर विभागाचे आयुक्त जी श्रीकांत यांनी केली. राष्ट्रीय, राज्य महामार्गांवरील अतिक्रमणे हटविण्याच्या मोहिमेला प्राधान्य देण्याचे निर्देश त
अ


नांदेड, 24 जुलै (हिं.स.)।

नांदेड जिल्ह्यातील अतिक्रमण हटविण्यासाठी कठोर कारवाई करावी अशी सूचना छत्रपती संभाजी नगर विभागाचे आयुक्त जी श्रीकांत यांनी केली.

राष्ट्रीय, राज्य महामार्गांवरील अतिक्रमणे हटविण्याच्या मोहिमेला प्राधान्य देण्याचे निर्देश त्यांनी दिले. पोलीस प्रशासनाच्या समन्वयाने नियमानुसार मोजणी करून घरे, दुकाने किंवा इतर कोणतेही अतिक्रमण असल्यास त्यावर कारवाई करावी, असे त्यांनी स्पष्ट केले.

त्याचबरोबर पाणंद रस्त्यांवरील अतिक्रमणे हटवून ते कायमस्वरूपी मोकळे ठेवण्यावर भर देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. ग्रामीण भागातील वाहतूक आणि शेतीसाठी पाणंद रस्ते अत्यंत महत्त्वाचे असल्याने त्यांचे मजबुतीकरण करण्यावर भर द्यावा, असे ते म्हणाले.

महसुली कामांचा आढावा

बैठकीत अकृषिक अधिमूल्याची एकरकमी वसुली, शासकीय महसूल वसुली, शासकीय जमिनींशी संबंधित प्रकरणे, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 अंतर्गत प्रकरणे, एम-सॅण्ड धोरणाची अंमलबजावणी, गौण खनिज उत्खननावरील दंडात्मक वसुली, शेतकरी आत्महत्या अहवाल, डेटा सेंटरसाठी जमीन उपलब्धता, बीएसएनएल टॉवर उभारणीसाठी जमीन, ई-पीक पाहणी, ई-फेरफार, न्यायालयीन प्रकरणे, महसूल मंत्र्यांकडील प्रलंबित प्रकरणे इ. तसेच कर्मचारी समाधान शिबिरांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

याशिवाय प्रधानमंत्री आवास योजना, घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाळू उपलब्ध करून देण्याची कार्यवाही, शासकीय जमिनींचे प्रस्ताव आणि विविध विकासकामांची सद्यस्थिती यावरही चर्चा झाली. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सादरीकरणाद्वारे जिल्ह्यातील विकासकामे, प्रलंबित प्रकरणे आणि त्यावरील कार्यवाहीची माहिती दिली.

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande